'वनजमिनीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये'

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 7 मे 2018

मंचर (पुणे) : "जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यात एकूण 428.38 एकर वनजमिनीतील अतिक्रमणे काढून टाकली आहेत. त्यावेळी काही अतिक्रमणे धारकांच्या विरोधात गुन्हेही दाखल केले आहेत. सर्वाधिक अतिक्रमणे जुन्नर तालुक्यात झाली होती. पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अतिक्रमण धारकांना कुणीही पाठबळ देऊ नये. वनजमिनीत अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील" असा इशारा जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांनी दिला आहे.
 
ते म्हणाले, ता. 18 मे 2016 ते 18 मे 2017 या कालावधीत अतिक्रमणे काढून टाकण्याची ठोस मोहीम वनखात्याने राबविली होती. 26 गावातील 377 घरे व झोपड्या वनजमिनीतून काढून टाकल्या आहेत. या कमी वनव्यव्यस्थापन समित्या व गावकर्यांचे चांगले सहकार्य मिळाले. निसर्ग टिकविणे व त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्त्यव आहे. अतिक्रमण करण्याचे काम गेली काही महिने थांबले होते पण, गेल्या आठ दहा दिवसापासून जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात काही जणांनी वनजमिनीत अतिक्रमण करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांना कुणीही पाठींबा देऊ नये. वनजमिनीत कुणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्यास नागरिकांनी जवळच्या वन कार्यालयात संपर्क साधावा. सबंधीताची नावे गुप्त ठेवली जातील.

अतिक्रमण क्षेत्र
वनपरिक्षेत्र ओतूर : 143.35 हेक्टर, वनपरिक्षेत्र जुन्नर : 13.55 हेक्टर, वनपरिक्षेत्र मंचर : 11.33 हेक्टर, वनपरिक्षेत्र शिरूर : 5.36 हेक्टर.

वृक्ष लागवड नियोजन
जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यात 10 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. पावसाळ्यात वृक्ष लागवड केली जाईल. रोपे तयार करण्याचे काम रोपवाटिका मध्ये सुरु आहे. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती, वनव्यव्यस्थापन सामित्यांचे वृक्ष लागवडीसाठी सहकार्य घेतले जाईल, असे अर्जुन म्हसे यांनी सांगितले.

Web Title: Do not try to encroach on Forest land