पुणेकरांनो, पावसात सिंहगडावर येऊ नका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

सिंहगडावर मागील आठ- दहा दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. 15 ऑगस्ट, शनिवार व रविवार अशा तीन दिवस सलग सुट्ट्या आहेत. यापार्श्वभूमीवर पर्यटकांची संख्या वाढणार आहे. पर्यटकांनी जोराचा पाऊस असल्यानंतर सिंहगड- खडकवासला धरण परिसरात येणे टाळावे. असे आवाहन हवेली पोलिस व भांबुर्डा वन विभागाने केले आहे.

पुणे : सिंहगडावर मागील आठ- दहा दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. 15 ऑगस्ट, शनिवार व रविवार अशा तीन दिवस सलग सुट्ट्या आहेत. यापार्श्वभूमीवर पर्यटकांची संख्या वाढणार आहे. पर्यटकांनी जोराचा पाऊस असल्यानंतर सिंहगड- खडकवासला धरण परिसरात येणे टाळावे. असे आवाहन हवेली पोलिस व भांबुर्डा वन विभागाने केले आहे. 

सध्या सिंहगड घाट रस्त्यात छोट्या-मोठ्या दरडी पडत आहेत. घाटातील रस्त्यालगतच्या भाग मागील आठ दहा दिवसापासून मुसळधार पाऊस पडला आहे. गुरुवारी रात्री दरड पडली होती. ती दरड वनरक्षक बाळासाहेब जीवडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जयंत काकडे, वन सरंक्षण समितीचे नितीन गोळे, रोहित पढेर, तानाजी खाटपे, मंगेश गोफणे, बबन मरगळे पिंटू भोळे राजेंद्र बडदे स्थानिक ग्रामस्थ पंडित यादव, माऊली कोडीतकर, युवराज पायगुडे राजेंद्र चव्हाण, विक्रम भाडले येथे मदत केली. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जयंत काकडे यांनी सांगितलले की, "दरडी प्रतिबंधक जाळ्या बसविण्याचे काम सध्या मुसळधार पावसामुळे थांबविले आहे. जाळ्या बसवण्यासाठी खडकाला होल(बोळ) पाडून त्याच लोखंडी गज बसवलेले आहेत. जाळ्या बसण्यापूर्वी पावसाला सुरुवात झाल्याने काम थांबवले. त्यासाठी एक कोटी 24 लाख रुपये निधी मंजूर झाला असून यामध्ये साठ मीटर लांब व बारा मीटर रुंद अशी जाळी बसवली जाणार आहे"

पर्यटक नागरिकांनी सहकार्य करावे

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे अनेक जिल्ह्यात महापुराची परिस्थिती आहे. दरडी पडत आहेत 
गरज पडल्यास कोणत्याही वेळी सिंहगड बंद केला जाईल. त्यामुळे शिवप्रेमी, पर्यटक, प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक गडावरील खाद्यपदार्थ विक्रेते तसेच धरण चौपाटीवरील खाद्यपदार्थ विक्रेते यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. असे आव्हान भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार आणि हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: do not visit to the Sinhagad fort in the rain