पुणेकरांनो.. तुम्हाला 'मिसळ डे' साजरा करायला आवडेल का?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

पुणे : काय पुणेकरांनो..! तुम्हाला मिसळ 'डे' साजरा करायला आवडेल का? अहो बरोबरच बोलतोय. आता पाहा, देशभरात बर्गर डे, कॉफी डे असे शेकडो 'डे' साजरे केले जातात. पण, आपल्या लक्षात राहतो तो 'व्हॅलेंटाइन डे' हा एकच ना... आता तुम्ही म्हणाल हे 'मिसळ डे' ही काय भानगड आहे, तर ते असं आहे की, एका मिसळ विक्रेत्याने पत्रकार परिषद घेत 'मिसळ डे' करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

मुख्य मुद्दा असा की, "मिसळ दरबार' या मिसळच्या दुकानाच्या मालक सुशील विंचवेकर यांनी बुधवारी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेत "मिसळ डे' साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'मिसळ डे'साठी त्यांनी 12 एप्रिल हा दिवस देखील निवडला आहे. देशभरामध्ये मिसळचे शौकीन मोठ्या प्रमाणात आहेत.

वडापाव म्हटलं की आपल्या तोंडातून जसं मुंबईच नाव निघते तसं मिसळ म्हटलं की पुण्याचेही नाव आपसूकच निघत. हाच मुद्दा धरून या त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या मते मिसळ डे साजरा करण्यास सुरवात झाली तर, मिसळची लोकप्रियता वाढेल. सध्या महाराष्ट्रामध्ये दक्षिणात्य खाद्यपदार्थ आणि चायनीज खाद्यपदार्थांचे अतिक्रमण झाले असून 'मिसळ डे'च्या निमित्ताने या खाद्यपदार्थांशी मराठमोळी मिसळ स्पर्धा करू शकेल, असा विश्‍वास विंचवेकर यांनी यावेळी व्यक्त केला. तर मग, पुणेकर आपली ओळख आहे ती शनिवारवाडा, सारसबाग आणि मिसळ! आता आपल्या मिसळचा "डे' सुरू झाला तर तुम्हाला कसं वाटेल. तर मग सांगा कमेंट करून. 

Web Title: Do you like to celebrate 'Misal Day'