तलाकवर ‘तिहेरी खान’ गप्प का? - विक्रम गोखले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

पुणे - ‘‘तिहेरी तलाक ही पद्धत मुस्लिम महिलांसाठी त्रासदायक बनली आहे, त्यामुळे अनेक महिलांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. मग, शबाना आझमी तिहेरी तलाकवर का बोलत नाहीत? त्यांना धर्मातून काढून टाकतील, अशी भीती वाटते का? शबानाच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतल्या प्रत्येक खानने तिहेरी तलाकबद्दल बोलले पाहिजे; पण सगळेजण गप्प का?’’ असा सवाल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी उपस्थित केला.

बलराज साहनी- साहिर लुधियानवी फाउंडेशनचा ‘बलराज साहनी पुरस्कार’ विक्रम गोखले यांना, तर लेखिका इंदुमती जोंधळे यांना ‘कैफी आझमी पुरस्कार’ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश 
टिळेकर, शिवानी हरिश्‍चंद्रे  उपस्थित होते.

गोखले म्हणाले, ‘‘कोणीही उठून जवानांविषयी काहीही बोलतोय. अशा लोकांचा राग येतो. सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती आपण आदर राखला पाहिजे; पण आज तसे होताना दिसत नाही. समाजात कन्हैया कुमारसारखे शेकडो लोक फिरत आहेत, जवानांबद्दल काहीही बोलत आहेत. त्यात लोकप्रतिनिधीही मागे नाहीत. जवानांविषयी आणि लष्कराविषयी बोथट विधान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.’’ 

जोंधळे म्हणाल्या, ‘‘कैफी आझमी यांनी उर्दू साहित्य पुढे नेले. उर्दू साहित्यातील त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.’’  धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. 

खान फिके पडतील
‘‘बलराज साहनी हे अभिनयसम्राट होते. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. फार कमी अभिनेत्यांच्या अभिनयाचा अभ्यास करावा, त्यातील ते एक होते. त्यांच्या अभिनयापुढे चित्रपटसृष्टीतील ‘खान’मंडळीही फिकी पडतील,’’ असे गोखले यांनी सांगितले.

Web Title: Do you talk about 'Khan' on divorce