दुर्गम भाग...आसपास दवाखाना नाही अन् तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या...

प्रा. प्रशांत चवरे 
Tuesday, 12 May 2020

डाॅक्टटरांनी दाखविलेल्या प्रसंगावधान व माणुसकीमुळे महिला व बाळाचे प्राण वाचू शकले. 

भिगवण (पुणे) : कात्रज (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील कातकरी समाजातील महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. कुटुंबातील व्यक्तींनी प्रसंगावधान राखत 108 क्रमांकावर फोन केला. रुग्ण सेवेमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्‍टरांनी महिलेच्या आरोग्याची स्थिती पाहून व बारामती येथे पोहोचण्या पूर्वी धोका उद्भवण्याची शक्‍यता विचारात घेऊन येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांशी संपर्क साधला. दोन्ही डॉक्‍टरांनी दाखविलेले प्रसंगावधान व माणुसकीमुळे महिला व बालकाचे प्राण वाचू शकले. 

कोथरूडकर म्हणताहेत, रेडझोनमधील रहिवाशांना कोथरूडमध्ये आणाल तर....

लॉकडाऊनच्या काळात डॉक्‍टरांच्या रूपाने देवदूतच धावून आल्याची भावना महिलेने व्यक्त केली. वैद्यकीय सेवेतील डॉक्‍टर हे खऱ्या अर्थाने देवदुताची भूमिका बजावत आहे. कात्रज (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील दुर्गम भागातील शेतमजूर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. महिलेची आरोग्याची स्थिती अतिशय चिंताजनक होती व जवळपास दवाखान्याचीही सोय नसल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेस फोन केला. 

पुण्याची जिद्दी कन्या, बाळंतपणातून उठून लढतेय आेडिशात कोरोनाची लढाई...

भिगवण येथील रुग्णसेवेतील डॉ. राजन सोनवणे यांनी महिलेची परिस्थिती पाहिली असता महिलेमध्ये रक्ताचे प्रमाण हे पन्नास टक्‍यांहुन कमी होते. बारामती येथे रुग्णालयामध्ये पोहोचण्यापुर्वीच महिलेच्या आरोग्यास असलेला धोका विचारात घेऊन डॉ. सोनवणे यांनी भिगवण येथील गोडसे नर्सिंग होम मधील डॉ. युवराज गोडसे व डॉ. आदिती गोडसे यांनी संपर्क साधून विचारणा केली. 

आप वापस आयेंगे क्‍या ? पुण्याहून एमपीला निघालेले मजूर म्हणाले...

गरोदर महिलेची परिस्थिती विचारात घेऊन डॉ. युवराज गोडसे व डॉ. आदिती गोडसे यांनी रक्ताची उपलब्धता करत सदर महिलेची तातडीने प्रसूती केली व बाळ व बाळंतिणीस संकटातून सुखरूप बाहेर काढले. डॉ. राजन सोनवणे यांनी दाखविलेले प्रसंगावधान व संकटाच्या काळात पैशाचा विचार न करता केवळ माणुसकीच्या नात्याने धावून आलेले डॉ. युवराज व डॉ. आदिती गोडसे यांच्यामुळे शेतमजूर महिलेचे व बाळाचे प्राण वाचू शकले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

डॉ. गोडसे यांनी विना मोबदला व तप्तर दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. याबाबत डॉ. सोनवणे म्हणाले, "सदर महिलेची अवस्था अंत्यत वाईट होती. शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे गरोदर महिला व बाळ दोन्हीस धोका होता. कात्रज व बारामती अंतर विचारात घेता तिथपर्यंत सुखरूप पोहचण्याविषयी शंका आल्यामुळे डॉ. युवराज गोडसे यांच्याशी संपर्क 
साधला. बाळ व बाळंतीण सुखरूप असल्यामुळे समाधान आहे.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: docter help to pregnat woman in katraj