डॉ. चंदनवाले यांची मुंबईत बदली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पुणे - बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची मुंबईतील जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात बदली झाली. त्यांनी गुरुवारी ‘जे. जे.’च्या अधिष्ठाता पदाची सूत्रे हाती घेतली. पुण्यातील डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे ‘बी. जे.’च्या प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे.

डॉ. चंदनवाले यांनी १३ मे २०११ रोजी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाची सूत्रे स्वीकारली होती. गेल्या साडेसात वर्षांमध्ये बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न ससून रुग्णालयात आमूलाग्र सुधारणा केली. ‘स्वच्छ ससून - सुंदर ससून’ ही मोहीम राबवून रुग्णालयातील स्वच्छतेवर भर दिला. त्यातून ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेचा दर्जा वाढला. त्यानंतर आता त्यांनी ‘जे. जे.’च्या अधिष्ठाता पदाची कार्यभार स्वीकारला आहे.

Web Title: Doctor Ajay Chandanwale Transfer to Mumbai