डॉक्‍टरांवरील हल्ले चिंताजनक - पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

औंध - ‘‘राज्यात व देशात डॉक्‍टरांवर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,’’ असे मत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. बाणेर

बालेवाडी मेडिकोज असोसिएशनच्या वतीने बाणेर येथे डॉक्‍टर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नगरसेवक बाबूराव चांदेरे, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. एस. महाजन, संस्थापक डॉ. राजेश देशपांडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्‍वर तापकीर आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. नीरज आडकर, डॉ. शिरीष हिरेमठ, डॉ. राजेश देशपांडे, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते केला.

त्यापेक्षा शेतकऱ्यांची निवासस्थाने चांगली
हिंजवडी व बालेवाडीचे प्रकल्प झाल्यानंतर येथील जमिनीचे भाव वाढले. येथील जुन्या शेतकरी कार्यकर्त्यांची घरे माझ्यासह माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी व दिल्लीत जनपथावरील निवासस्थानांपेक्षा चांगली आहेत; पण जमिनीचे वाढते भाव व पैसा आल्याने पूर्वीसारखा प्रेमाचा ओलावा दिसून येत नसल्याची खंतही या वेळी पवार यांनी व्यक्त केली.

Web Title: Doctor Attack Worrisome Sharad pawar