डॉक्‍टर सरकारी; प्रॅक्‍टिस खासगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

येरवडा - महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी इतर रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने खासगी प्रॅक्‍टिस करत असल्याचे उघड झाले आहे. शहरासह उपनगरांतील प्रसिद्ध रुग्णालयांत सध्या असे डॉक्‍टर नॉन प्रॅक्‍टिसिंग अलाउंस घेऊन सेवा देत आहेत; मात्र त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. 

महापालिकेच्या आरोग्य विभागातील १५६ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी अनेक जण पगाराच्या ३५ टक्के नॉन प्रॅक्‍टिसिंग अलाउंस घेऊन नियमबाह्यपणे पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील खासगी मोठ्या रुग्णालयांत व्यवसाय करत आहेत. ही बाब उघडपणे महापालिकेतील डॉक्‍टरांच्या चर्चेचा विषय झाला आहे. तरीसुद्धा याची माहिती आरोग्यप्रमुखांना नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांत महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नामफलक असल्याची चर्चा आहे, तर काही जणांचे उपनगरांत स्वत:चे खासगी रुग्णालय आहेत.

Web Title: Doctor Government Practice Private