डॉक्‍टरच्या चिठ्ठीमुळे पोलिसांची धावपळ

Police
Police

पिंपरी - ‘एमडी डॉक्‍टर होण्याची तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, मला माफ करा,’ अशी चिठ्ठी लिहून एक महिला डॉक्‍टर घरातून निघून गेल्या. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, त्यांनी फोन करून सुखरूप असल्याचे सांगताच सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला.

पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिला डॉक्‍टरचा विवाह फेब्रुवारीत एका एमडी डॉक्‍टरशी झाला. आपल्या पत्नीनेही एमडी व्हावे, अशी पतीची इच्छा होती. त्यांनी परीक्षेचा पेपर दिला. मात्र, तो अवघड गेल्याने त्यांना नैराश्‍य आले होते. गुरुवारी (ता.२३) अचानक त्या घरी वरील आशयाची चिठ्ठी सोडून निघून गेल्या. डॉक्‍टरने आपल्या पत्नीला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. यामुळे त्यांनी थेट सांगवी पोलिस ठाणे गाठले.

वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी सोशल मीडियावर डॉक्‍टर महिलेचा फोटो आणि माहिती व्हायरल केली. दोन तासांनी डॉक्‍टर पत्नीचा पतीला नाशिक फाटा येथे असल्याचे फोनवर सांगितले. त्यांनी त्वरित नाशिक फाटा येथे धाव घेऊन पत्नीची भेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com