डॉक्‍टरांची ओपीडी आज बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

पुणे - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (ता. ३०) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे विधेयक मांडले जाण्याची शक्‍यता आहे. विधेयकातील जाचक तरतुदींना विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शनिवारी (ता. २८) काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे उद्या बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद राहतील.

आंदोलनांतर्गत ओपीडी बंद राहणार आहे. मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र, रुग्णालयांमध्ये अत्यावश्‍यक सेवा सुरू राहतील. शिवाय शासकीय रुग्णालये सुरू राहतील. वैद्यकीय महाविद्यालयांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याने तेथील ओपीडी बंद राहील. नियोजित शस्त्रक्रियाही होणार नाहीत.

शुल्क निश्‍चितीत खासगी महाविद्यालये, विद्यापीठांची मनमानी नसावी, देशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा केंद्र स्तरावरील नसावी, परदेशातील डॉक्‍टरांना पूर्वीप्रमाणे परीक्षेद्वारे प्रॅक्‍टिसला परवानगी असावी, राष्ट्रीय स्तरावरील संस्थेत राज्यांचे प्रतिनिधित्व पूर्वीप्रमाणे असावेत, आयुष डॉक्‍टरांना ब्रीज कोर्सद्वारे ॲलोपॅथी प्रॅक्‍टिसला विरोध आदी प्रमुख मुद्दे ‘आयएमए’ने उपस्थित केले आहेत.

भारतीय वैद्यक परिषद बरखास्त करण्याची गरज नव्हती. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या व्यवस्थेत डॉक्‍टरांचे प्रतिनिधित्व नाही. सरकारनेच नियुक्त केलेले प्रतिनिधी असल्याने सरकारच्याच बाजूने निर्णय घेतले जाण्याची शक्‍यता आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, नियंत्रण करणारी यंत्रणाच या कायद्यात नाही.
- डॉ अविनाश भोंडवे, नियोजित अध्यक्ष आयएमए, महाराष्ट्र

Web Title: Doctor OPD closes today