डॉक्‍टरांनो, गरिबांसाठी वेळ द्या - डॉ. थोरात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पुणे - ‘‘डॉक्‍टरांनो, सामाजिक जबाबदारी समजून केवळ दोन तास गरिबांसाठी द्या. फार लांब जाऊ नका. जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन सेवा द्या. यातून समाजाचा डॉक्‍टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि नागरिकांचे स्वास्थ चांगले झाले, तर देश हजार वर्षांसाठी महासत्ता होईल,’’

असा विश्‍वास पोट विकारतज्ज्ञ डॉ. विनय थोरात यांनी व्यक्त केला. 
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने डॉ. थोरात यांचा गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार देऊन सन्मान केला. त्या वेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, खासदार अनिल शिरोळे, संस्थेच्या ज्योत्स्ना एकबोटे, श्‍यामकांत देशमुख, प्रतिभा थोरात आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘देश पारतंत्र्यात असताना पुढील पिढीच्या शिक्षणासाठी संस्था उभारण्याचा प्रयत्न त्या वेळच्या शिक्षकांनी केला. आता स्वातंत्र्यनंतर आपण काही करू शकतो का, याचा विचार प्रत्येक नागरिक आणि विद्यार्थ्याने केला पाहिजे. ज्ञानी माणूस ज्ञान स्वत:कडे साठवून ठेवत नाही, तर ते तो वाटत राहतो. त्यानेच ज्ञान वाढत राहते. डॉक्‍टरांनी रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच ज्ञानदानही करत राहिले पाहिजे.’’

‘‘आपण देव पाहिलेला नाही; पण देवाचा दूत म्हणून आपण डॉक्‍टरकडे पाहतो. समाजाकडून त्यांचा सन्मान झाला पाहिजे,’’ असे सांगत मुक्ता टिळक यांनी युवतींची आरोग्य तपासणी महापालिकेमार्फत करण्याचा मानस व्यक्त केला.

Web Title: doctor time give to poor