डॉक्टर हरवले आहेत' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पुणे ः कळस येथे महापालिकेच्या गेनबा तुकाराम म्हस्के दवाखान्यात डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने नागरिकांची खूप मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या छावा संघटनेतील पदाधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात असून, हॉस्पिटलबाहेर "डॉक्‍टर हरवले आहेत- शोधून देणाऱ्यास पाचशे एक रुपयांचे बक्षीस' अशा आशयाचा फलक त्यांनी लावला आहे. 

या दवाखान्यात गोरगरीब रुग्णांना कमी खर्चात वैद्यकीय तपासणी व औषधोपचार घेता येतात. दवाखान्यातील डॉक्‍टर, परिचारिकांसह अन्य सहायक कर्मचाऱ्यांवर महापालिका विशेष आर्थिक तरतूद करते, जेणेकरून गोरगरीब रुग्णांना त्यांच्या स्थानिक भागात उपचार मिळावेत. पण, कळस येथील दवाखान्यात वारंवार महिला, ज्येष्ठ नागरिक, इतर रुग्ण तपासणी किंवा काही लस घेण्यासाठी जातात, तेव्हा डॉक्‍टर जागेवरच नसतात. "आज डॉक्‍टर येणार नाहीत.' "डॉक्‍टर जेवायला गेलेत,' "डॉक्‍टर बाहेरगावी गेले आहेत, दोन दिवसांनी या' अशी एक ना अनेक कारणे रुग्णांना दिली जातात. त्यामुळे नागरिकांना अनेक वेळा चकरा माराव्या लागतात. यामुळे नागरिकांना होणारा मानसिक, शारीरिक त्रास व त्यांच्या वेळेचा होणारा अपव्यय, यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. 

विश्रांतवाडी येथील रहिवासी ऋषिकेश भट्ट, विनेश मोरेदेखील कुटुंबातील व्यक्तींना घेऊन उपचार घेण्यासाठी गेले असताना त्यांना हाच अनुभव आला. 
--------------- 

""दवाखान्यात डॉक्‍टर नसल्याचे वारंवार सांगितले जाते. जे डॉक्‍टर दवाखान्यात उपलब्ध होत नाहीत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही अत्यावश्‍यक सेवा आहे. ती व्यवस्थित सुरू राहिली पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. या संदर्भात छावा संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.'' 
- द्वारकेश जाधव, छावा संघटना 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Doctors are lost