
शहरातील काही खासगी प्रयोगशाळेत कोरोना रॅपिड अँटीजेन पॉझिटीव्ह आल्यानंतर शासकीय आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह येत असल्याने अनेकदा गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.
बारामती : शहरातील काही खासगी प्रयोगशाळेत कोरोना रॅपिड अँटीजेन पॉझिटीव्ह आल्यानंतर शासकीय आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह येत असल्याने अनेकदा गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. या मध्ये खाजगी प्रयोगशाळा चालक डॉक्टरांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या संदर्भात येथील प्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन व्होरा म्हणाले, कोवीड चे निदान रॅपिड अँटीजेन टेस्ट व आरटीपीसीआर चाचणी करून होते. अँटीजेन चे रिपोर्ट तीन तासात मिळतात. अँटीजेन पॉझिटीव्ह आल्यानंत आरटीपीसीआर करायची गरजच नसते. अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली व संशय जास्त असेल तर खात्री करण्यासाठी आरटीपीसीआर केली जाते. आरटीपीसीआर च्या रिपोर्टला 24 तास लागतात.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दोन्ही टेस्ट निगेटिव्ह असतील व शंका दाट असेल तर चेस्ट सीटी स्कॅन करावा लागतो. अँटीजेन व आरटीपीसीआरची सेन्सिटीव्हीटी 60 ते 70 टक्के असते. याचा अर्थ कोवीड असून सुद्धा 20 ते 30 टक्के रुग्णांमध्ये टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. सँम्पल कसे घेतले, आजाराच्या कोणत्या टप्प्यावर घेतले यावर सुद्धा रिपोर्ट अवलंबून असतो. त्यामुळे माझा रिपोर्ट एका ठिकाणी पॉझिटीव्ह व दुसऱ्या ठिकाणी निगेटिव्ह असा गैरसमज होतो पॉझिटीव्ह हा रिपोर्ट हा पाँझिटीव्हच असतो. (फाल्स पॉझिटीव्ह ची शक्यता एक टक्क्यांपेक्षाही कमी असते.)
देशातील मोठ्या ब्रॅंडच्या मधामध्ये चिनी साखरेची भेसळ?
आपल्याला ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, जुलाब असेल अथवा वास व चव नसेल तर टेस्ट करणे गरजेचे आहे. कोणत्याही शंका असतील तर आपल्या डॉक्टरांचा कोरोनाच्या साथीचा धोका अजूनही टळलेला नसून नागरिकांनी कमालीची काळजी घ्यायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन व्होरा यांनी केले.
(संपादन : सागर डी. शेलार)