हडपरमध्ये राष्ट्रीय डाॅक्टर दिन उत्साहात साजरा

कृष्णकांत कोबल
सोमवार, 2 जुलै 2018

मांजरी (पुणे) : स्त्रियांवरील अत्याचार आणि त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक आजच्या पुढारलेल्या समाजातही क्षणोक्षणी दिसून येत आहे. त्यासाठी त्यांनी शिक्षित, धाडसी आणि दूरदृष्टी ठेऊन जिजाऊंची भूमिका बजावली पाहिजे, असे मत शिवव्याख्याते नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केले.

हडपसर मेडिकल असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ कन्सल्टंट पुणे  यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर परिसरातील वैद्यकीय व्यवसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी राष्ट्रीय डाॅक्टर दिनानिमित्त शिवव्याख्याते नामदेवराव जाधव यांच्या व्याख्यानासह विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात जाधव यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते जाधव बोलत होते.

हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे, सचिव डॉ. सचिन अबणे, कोषाध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट चे अध्यक्ष डॉ. दिलीप माने, सचिव डॉ. अनुराधा जाधव सहसचिव डॉ. चेतन म्हस्के, कोषाध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी संयोजन केले.

व्याख्याते जाधव म्हणाले, "जिजाऊंचा आदर्श घेऊन महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यामुळे स्त्रियांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळाला आहे. चारशे वर्षांपूर्वीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन आजच्या काळातही मार्गदर्शक ठरत आहे. सर्वसामान्य माणसाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आपण सर्वांनी स्विकारण्याची गरज निर्माण झाली आहे.''

Web Title: doctors day celebrated in hadapsar