बालकांना इन्फ्लुएंझा लसीकरणाचा आग्रह

बालकांना इन्फ्लुएंझा लसीकरणाचा आग्रह

पुणे : 'तुमच्या घरात अमुक वयाचा लहान मुलं आहेत. त्याला इन्फ्लुएंझाची लस द्यावी लागेल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्यामुळे सरकारनेच या लशीची शिफारस केली आहे. उद्या क्लिनिकला येऊन तुम्ही लस घेऊ शकता.' असा फोन कॉल सध्या डॉक्टरांकडून येत असल्याचे पालक सांगतात. कोरोनाच्या नावाखाली सध्या अनेक पालकांना ही लस घेण्याचा आग्रह वाढला आहे.

बालकांना इन्फ्लुएंझा लसीकरणाचा आग्रह
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पास जमीन देण्यास शेतकऱ्यांचा नकार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स आणि मुख्यमंत्र्यांची नुकतीच एक बैठक झाली. त्या बैठकीच्या शेवटी एका बालरोग तज्ज्ञांनी 'पावसाळ्यात इन्फ्लुएंझा आजार होऊ नये म्हणून, पालकांना त्यासंबंधीची लस घेण्याची शिफारस करावी', अस म्हटले होते. त्याचाच संदर्भ घेत शहरासह गावोगावी काही डॉक्टरांनी पालकांना या लसीचा आग्रह धरला आहे. विशेष म्हणजे यासाठी पालकांना फोनही केले जात आहे. यासंबंधी टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रमोद जोग यांच्याशी 'सकाळ'ने सम्पर्क साधला. ते म्हणाले,"कोरोना आणि इन्फ्लुएंझा या दोन्ही आजाराची लक्षणे सारखीच आहे. ही लस घेतल्यास निदान एका आजारापासून तरी बालकाचा बचाव होईल, अशी डॉक्टरांची भूमिका आहे. परंतु इन्फ्लुएंझा लसीकरणाचा कोरोनाशी कोणताही संबंध नाही. ती फक्त इन्फ्लुएंझा आजारापासून बचाव करण्यासाठी आहे." संबंधित लस नियमित लसीकरणाचा भाग नाही. त्यामुळे ती खासगी रुग्णालयात पैसे देऊन घ्यावी लागते. संबंधित लसींचाही तुटवडा भासत असल्याचे डॉक्टर कळतात.

बालकांना इन्फ्लुएंझा लसीकरणाचा आग्रह
पुणे जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या प्रवास भत्त्यात वाढ

इन्फ्लुएंझा लसीकरणाचे तथ्य :

- या लसीचा कोरोनाशी संबंध नाही

- सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असलेल्या आणि मुख्यतः पावसाळ्यात होणाऱ्या 'इन्फ्लुएंझा' आजारावरील लस

- कोरोना आणि इन्फ्लुएंझा हे दोन्ही आजार एकाच वेळी होऊन, बालकाला जास्त त्रास होऊ नये म्हणून ही शिफारस

- फक्त शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना प्रभावी असल्याची निरीक्षणे

- बालकांच्या नियमित लसीकरणाचा भाग नाही, फक्त शिफारस केली आहे

- भारतात वैद्यकीय चाचण्यांचा अभाव

इन्फ्लुएंझा लसीकरणाचा अर्थाअर्थी कोव्हिडशी संबंध जोडणे चुकीचे आहे. हे दोन्ही आजार श्वसनाशी निगडित आहे, हेच फक्त साधर्म्य. भारतात इन्फ्लुएंझा लसीच्या वैद्यकीय चाचण्या आणि शास्त्रीय माहितीचा अभाव असल्यामुळे ती अजूनही शासण्याच्या नियमित लसीकरणाचा भाग नाही. फक्त तिची शिफारस करण्यात आली असून, शून्य ते पाच वर्षांच्या आतील मुलांना ही लस प्रभावी ठरू शकते.

-डॉ. प्रमोद जोग, सदस्य, बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स

बालकांना इन्फ्लुएंझा लसीकरणाचा आग्रह
पुणे जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी जुगलबंदी पुन्हा रंगणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com