डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळं त्या चिमुकल्याला मिळाला चेहरा!

अश्विनी जाधव केदारी
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

सांग, दर्पणा कशी मी दिसते?  हा प्रश्न फक्त वयात येणाऱ्या मुलींनाच पडतो असं नाही. तो एखाद्या लहान मुलालाही पडू शकतो. आरश्यात पाहिल्यावर आपला चेहरा दिवसेंदिवस वाकडा होत आहे हे पाहून ते लहान मूलही अस्वस्थ होऊ शकतं. नेमकं असंच घडलं आठ वर्षांच्या सलमान आणि त्याच्या आईवडिलांसोबत.

पुणे : अवयव प्रत्यारोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं आपण पाहतो, मात्र हाडाच्या तुकड्याच्या रोपणाची दुर्मिळ शस्त्रक्रिया करून वाकडा झालेला चेहरा सरळ करण्यात पुण्यातील डॉक्टरानां यश आले आहे. जबड्याला उर्वरित डोक्याच्या भागाशी जोडणारा कानाजवळचा सांधाच जन्मतः नसलेल्या लहानग्या रुग्णावर त्याच्याच बरगडीतून मिळवलेल्या हाडाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

वारकरी परिषदेच्या वादग्रस्त पत्राला पवारांचं उत्तर; 'तुम्हाला संप्रदायच कळाला नाही'

No photo description available.

सांग, दर्पणा कशी मी दिसते?  हा प्रश्न फक्त वयात येणाऱ्या मुलींनाच पडतो असं नाही. तो एखाद्या लहान मुलालाही पडू शकतो. आरश्यात पाहिल्यावर आपला चेहरा दिवसेंदिवस वाकडा होत आहे हे पाहून ते लहान मूलही अस्वस्थ होऊ शकतं. नेमकं असंच घडलं आठ वर्षांच्या सलमान आणि त्याच्या आईवडिलांसोबत.
सात वाजता उठायचं नाही, कामाला लागायचं; अजित पवारांचा आव्हाडांना टोला

वर्गातल्या इतर मुलांसारखा आपला चेहरा आणि तोंड प्रमाणबद्ध का नाही? हा सवाल त्यांनी अनेक डॉक्टरांना केला पण, समाधानकारक खुलासा आणि उपचार होऊ शकला नव्हता. अखेरीस त्यांना ह्या समस्येवर पुण्यातील कॅम्प भागातील एम ए रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये उत्तर मिळाले. तेथील ओरल सर्जरी विभागप्रमुख डॉ जनार्दन गार्डे यांनी छोट्या सलमानच्या आवश्यक त्या तपासण्या करून अचूक निदान केले.

पिंपरीत बसथांब्यावर कोसळले झाड: प्रवासी जखमी 

सलमानला जबड्याच्या एका बाजूचा सांधा आणि जबड्याच्या हाडाचा अर्धा भागच नव्हता. शरीराची गर्भावस्थेत नैसर्गिकरीत्या वाढ होतांना क्वचित असं होतं की, एखादा अवयव तयारच होत नाही. शास्त्रीय भाषेत याला अप्लासिया (aplasia)असे म्हटले जाते. जबड्याच्या सांध्याच्या बाबतीत ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना मानली जाते. बिचाऱ्या सलमानच्या बाबतीत निसर्ग एका बाजूचा सांधाच निर्माण करायला जणू विसरला होता व त्यामुळे जसेजसे वय वाढत गेले तसतसे एक बाजू आक्रसली जाऊन त्याचा चेहरा आणि तोंड वाकडे दिसू लागले होते.

पुण्यात हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी; दहा लाखांच्या खंडणीची मागणी

'हे निदान कळल्यावर त्याच्या आईवडिलांना साहजिकच चिंता वाटू लागली. मात्र, योग्य शस्त्रक्रिया करून सलमानच्याच एका बरगडीचे रोपण जबड्याच्या सांध्याच्या जागी केले. ही शस्त्रक्रिया अर्थातच अवघड आणि आव्हानात्मक होती मात्र त्यात यश आल्याने सलमानचे पालक समाधानी आहेत''
- डॉ जनार्दन गार्डे

''सलमानचा चेहरा आता प्रमाणबद्ध दिसू लागला असून तो तोंडावाटे व्यवस्थित जेवणही करू लागला आहे. तसेच बरगडीच्या कुर्चेत हाड वाढण्याची क्षमता असते ज्यामुळे भविष्यात त्याच्या जबड्याची वाढही नेहमीसारखी होईल.''
- सलमानचे पालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors from Pune are succeed to straighten the face by bone transplant surgery of 8 year old salman

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: