#SaathChal "साथ चल''साठी डॉक्टरांचा निर्धार

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 3 जुलै 2018

मांजरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह व फिनोलेक्स केबल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची ही संकल्पना घेऊन "साथ चल'' हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामध्ये सहभागी होऊन आईवडील व कुटुंबासाठी दिंडीमध्ये दोन पावले चालण्याचा निर्धार हडपसर परिसरातील मेडिकल असोसिएशन व असोसिएशनचे ऑफ कंन्सलटंटच्या सदस्यांनी केला आहे.     

परिसरात असोसिएशनचे 750 सदस्य असून या सर्वांनी सकाळच्या या उपक्रमाचे कौतुक करून सहभागी होण्याची शपथ घेतली आहे. सहयोगी संपादक सुनिल माळी यांनी ही शपथ दिली. येथील लोहिया उद्यानात सोमवारी (ता. 9) सकाळी एकत्र जमून आई-वडील व कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी शपथ घेऊन गाडीतळ पर्यंत दिंडीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, सचिव डॉ. सचिन आबणे, कोषाध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. मंगेश लिंगायत, डॉ. चेतन म्हस्के, डॉ. अनुराधा जाधव, डॉ. सुनिता घुले, डॉ. रोशनी कावळे, डॉ. विजय पवार,   डॉ. राहूल झांजुणे, डॉ. मंगेश बोराटे, डॉ. अजय माने, डॉ. सतिश सोनवणे, डॉ. अतुल कांबळे, डॉ. वैभव वनारसे, डॉ. विजय पवार,डॉ.हिमांशु पेनसे, डॉ. प्रसन्न नंदे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: doctors with saath chal in manjari