वालचंदनगर- थोरातवाडी मध्ये डाॅक्टरांनी केले श्रमदान

राजकुमार थोरात
रविवार, 15 एप्रिल 2018

वालचंदनगर (थोरातवाडी)- येथे इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील डॉक्टरांनी श्रमदान करुन पाणी आडवा,पाणी जिरवाचा संदेश दिला.

इंदापूर तालुक्यातील ३७ गावांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. प्रत्येक गावामध्ये श्रमदान करण्याची चढाओढ लागली आहे.तालुक्याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे, बेलवाडी, सणसर, भवानीनगर या परीसरातील डाॅक्टरांनी ग्रामस्थाबरोबर श्रमदान केले. दोन तासात ७३ घनमीटर काम झाले असून यामध्ये एका वर्षात १४ लाख ६० हजार लिटर पाणीसाठण्यास मदत होणार असल्याचे पाणी फाउंडेशनचे इंदापुर तालुका समन्वयक कृष्णांत शिंदे यांनी सांगितले.  

यावेळी डॉ.ज्योतीराम देसाई, डॉ.विशाल सपाटे, डॉ.नंदकिशोर साळुंके, डॉ.विनोद भरते, डॉ.योगिता खुटाळे,डॉ. अरविंद मुळीक, औषधनिर्माते सागर दुगड, रणजित गोरे, महेश चव्हाण, रणजित साळुंके, कृषी साहय्यक पांडुरंग कवितके, ग्रामविकास अधिकारी अजिनाथ भोसले, बाळासाहेब नगरे यांनी सहभाग घेतला.

Web Title: doctors social work in thoratwadi