चिमुकल्यांकडून कुत्र्यांच्या पिलांना जीवदान

रमेश जाधव
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

भगवान महावीरांच्या ‘अहिंसा परमो धर्मः’ या उक्तीचे केले पालन

तळेगाव दाभाडे (स्टेशन) - ‘अहिंसा परमो धर्म’ या महावीरांनी सांगितलेल्या उक्तीचे पालन करत येथील जैन इंग्लिश स्कूलच्या पाच बालमित्रांनी आईला पारख्या झालेल्या कुत्र्यांच्या पिलांना जीवनदान दिले आहे.

शाळेच्या सीमाभिंतीलगत पिले भुकेने व्याकूळ झाली होती, ती ओरडत होती. ते ऐकून रोहन जाधव, चिन्मय निंबळे, रोहित जाधव, स्वराज जांभूळकर आणि कपिल बारवकर यांनी तेथे धाव घेतली, तेव्हा तेथे त्यांना ११ नवजात पिले कुईकुई करताना आढळली. मात्र त्यांच्या आईंचा मागमूस नव्हता. शाळेचे सेवक संजय गरूड यांनी सांगितले, की दोन दिवसांपूर्वी या पिलांना जन्म देणारी दोन्ही कुत्री मेली. त्यांच्या मृतदेहाची दूरवर विल्हेवाट लावली. या पाचही मित्रांनी पिलांना वॉटरबॅगमधील पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरातून दूध आणले आणि ते पाजले. तीन आठवड्यांपासून पिलांच्या संगोपनात मुले व्यग्र आहेत. सुटीच्या दिवसांतही ते पिलांना खाऊ घालतात, गोंजारतात. मायेची ऊब या बालमित्रांकडून मिळाल्याने ही सर्व पिले आता सुखरूप आहेत. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बोदडे यांनीदेखील पिलांची तपासणी केली. संगोपनाच्या काही टीप्सही त्यांनी दिल्या. प्राणिमात्रांवर प्रेम करा हा संदेश या बालमित्रांनी प्रत्यक्षात आणल्याने त्यांचे कौतुकही होत आहे.

Web Title: dog life saving by children