मोकाट कुत्र्यांचा उपद्रव कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पिंपरी - गेल्या चार वर्षांत शहरातील मोकाट व भटक्‍या अशा ५८ हजार कुत्र्यांच्या शस्त्रक्रियांवर चार कोटी तीन लाख रुपये खर्च केल्याचा दावा महापालिकेने केला असतानाही मोकाट कुत्र्यांचा उपद्रव अद्यापही कायम आहे. 

त्यामुळे महापालिकेच्या दाव्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ही रक्कम प्रत्यक्षात खर्च झाली की, केवळ कागदोपत्री रंगविण्यात आली, याबाबत चौकशी करावी; तसेच यातील दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

या संदर्भात भापकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने शहरातील मोकाट व भटक्‍या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन खासगी एजन्सींची नेमणूक केली आहे. पकडलेल्या कुत्र्यांवर नेहरूनगर येथील गुलाबपुष्प उद्यानाशेजारच्या ‘डॉग शेल्टर’मध्ये शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे श्‍वान जेथून आणले त्या ठिकाणी सोडली जातात. 

एका श्‍वानाच्या शस्त्रक्रियेसाठी ६९३ रुपये खर्च येतो. चार वर्षांत या शस्त्रक्रियांवर चार कोटी तीन लाख हजार रुपये खर्च झाला आहे. इतकी रक्कम खर्च करूनही शहरात मोकाट व भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आलेले नाही. उलट त्यांची संख्या वाढलेली दिसते. त्यामुळे केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीदेखील कुत्रे पकडण्याची मोहीम राबवून हा उपद्रव नियंत्रणात आणावा. 

Web Title: Dog Nuisance Issue