रस्त्यावर प्राणी ठेवणे ही क्रूरता

Dog-Bite
Dog-Bite

ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या ९ मे २०१८ च्या पत्रकानुसार देशातील सर्व महापालिकांना रस्त्यावरील/मोकाट प्राण्यांना निवाऱ्यात ठेवण्याची सूचना केली आहे. रस्त्यावर प्राणी ठेवणे म्हणजे क्रूरता असल्याचे व जनतेला धोका असल्याचे म्हटले आहे. रस्त्यात मोकाट प्राणी आढळल्यास पोलिसात तक्रार करा. पीडित व्यक्ती कारवाईची मागणी करू शकते. प्राणी ताब्यात असलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते व नुकसानभरपाई घेता येऊ शकते. 
- मानव वादी 

भटकी कुत्री ही जागतिक समस्या होऊन बसली आहे; पण यावर मोफत औषधोपचारासाठी आपला देश व त्यात पुणे शहर फारच मागे आहे.
- नाना 

जे कुत्र्यांना घाबरतात त्यांनाच कुत्रे चावतात. कुत्र्यांना कळते कोण त्यांना मारणार आहे. मग ते आक्रमक होतात आणि स्वतःचा जीव वाचविण्यासाठी चावतात. प्राणिप्रेमी बना, मग कळेल. 
- देबोलीना घोष

बाणेर-पाषाण लिंक रोडवर भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. कोथरूड येथील महात्मा सोसायटीच्या १७ नंबर लेनमध्येही हीच अवस्था आहे. या भागात कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना नेहमी घडतात. 
- सौरभ पन्हाळे 

मंगला गोडबोले यांच्याबाबत घडलेल्या घटनेचे वाईट वाटते. महापालिकेला विनंती आहे, की अशा घटना पुढे होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करावे.
- अनुपम 

भटक्‍या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण हा यावरचा योग्य उपाय आहे. महापालिकेने यासाठी निधी द्यायला हवा. 
- सुषमा दाते 

बिबवेवाडीत राहतो. बिल्डिंगजवळील भटक्या कुत्र्यांमुळे माझ्या मुलांना गेटच्या बाहेर जायचीही भीती वाटते. 
- विनायक 

मी वडगावशेरीत राहतो. येथे भटकी व पाळीव कुत्री रस्त्यावर असतात. महापालिकेने त्यांना पकडावे
- सचिन महाले 

महाबली चौक, चिंचवड येथे भटक्‍या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यावर उपाय करावा.
- अमोघ घोडके

भटकी कुत्री हल्ला करतात...लहान मुलांना मारतात...ज्येष्ठ लोकांना जीवघेणी दुखापत करतात...तरीही प्राणिमित्र म्हणतात...भटक्‍या कुत्र्यांना मारू नका.... डिफिकल टू अंडरस्टॅंड...इतकं प्रेम असेल तर कुशीत घेऊन झोपा ना भटक्‍या कुत्र्यांना ...चावू दे...मनसोक्त... र्र#नॉनसेन्स
- सलील कुलकर्णी, संगीतकार

भटक्या कुत्र्यांबाबत सूचना पाठवा..फेसबुक आणि ट्विटरवर 
ई-मेल करा webeditor@esakal.com वर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com