Donje Gram Panchayat initiative Tribal Development Haveli Tehsil Office distribution of ration card caste certificate
Donje Gram Panchayat initiative Tribal Development Haveli Tehsil Office distribution of ration card caste certificate sakal

सिंहगड परिसरातील कातकरी कुटुंबांसाठी 'शासन आपल्या दारी' उपक्रम

रेशनकार्ड, जातप्रमाणपत्र व इतर कागदपत्रांचे वितरण; आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व हवेली तहसील कार्यालयाचा पुढाकार

किरकटवाडी: सिंहगड परिसरात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या परंतु अधिकृत ओळखपत्र व इतर कागदपत्रे नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असलेल्या कातकरी कुटुंबांसाठी डोणजे ग्रामपंचायत कार्यालयात शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव व हवेली तहसीलदार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 491 कातकरी नागरिकांना यावेळी वेगवेगळ्या कागदपत्रांचे वितरण करण्यात आले.

खडकवासला,डोणजे, घेरासिंहगड, खानापूर, मालखेड, वरदाडे, सोनापूर, आंबी व परिसरातील इतर गावांमध्ये वर्षानुवर्षे आदिवासी कातकरी समाज वास्तव्य करत आहे. मात्र यातील बहुतांश नागरिकांकडे स्वतःच्या ओळखीचा कोणताही पुरावा नाही. जातीचा दाखला नाही, तसेच रेशनकार्डही नाही. कागदपत्रांच्या अभावामुळे शासनाच्या अनेक योजना असताना कोणत्याही योजनेचा लाभ या नागरिकांना मिळत नाही. परिणामी अन्न,वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य अशा मुलभूत गरजाही या आदिवासी समाजाच्या पूर्ण होत नाहीत.

याचा विचार करून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव व तहसीलदार हवेली यांनी 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत आदिवासी कातकरी नागरिकांना वेगवेगळ्या कागदपत्रांचे वितरण केले. यामध्ये 80 नवीन आधारकार्ड, 39 रेशनकार्ड, 227 जातीचे प्रमाणपत्र, 12 उत्पन्न दाखले, 125 आरोग्य तपासणी दाखले व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 10 फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, हवेली तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या पूजा पारगे, सरपंच शितल भामे, नवनाथ पारगे, योगेश भामे आदी उपस्थित होते.

हक्काचा निवारा कधी मिळणार?

वर्षानुवर्षे हा आदिवासी कातकरी समाज झोपड्यांमध्ये राहत आहे. पक्की घरं नसल्याने पावसाळ्यात या कुटुंबांचे अत्यंत हाल होतात. 'सकाळ' च्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी या समाजाच्या व्यथा हवेली उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोचविण्यात आल्या होत्या मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

"सिंहगड परिसरातील आदिवासी बांधव विशेषतः कातकरी समाजाच्या लोकांना विविध प्रकारचे दाखले वितरण करण्यासाठी डोणजे ग्रामपंचायत कार्यालय सभागृहामध्ये शासन आपल्या दारी योजनेचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर रेशनचे धान्य आदिवासी कातकरी कुटुंबाच्या घरी पोहोचावे हा यामागचा विशेष हेतु होता." तृप्ती कोलते पाटील, तहसीलदार हवेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com