दुष्काळामुळे गाढवांना कमी मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

जेजुरी - जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त पारंपरिक गाढवांचा बाजार भरला आहे. एक हजारापेक्षा अधिक गाढवे विक्रीसाठी आली आहेत. यंदा दुष्काळामुळे कामे कमी असल्याने गाढवांना मागणीही कमीच राहिली. पाच हजारांपासून तीस हजारांपर्यंत त्यांना किंमत मिळाली. 

महाराष्ट्रात तीन ठिकाणी गाढवांचा बाजार भरला जातो. त्यामध्ये जेजुरी हे एक प्रमुख ठिकाण आहे. दिवाळीदरम्यान गुजरात येथून गाढवांची खरेदी करून त्यांचा सांभाळ करून ती जेजुरी बाजारात विकली जातात. पन्नास टक्के गाढवे गुजरातमधून या बाजारात विक्रीसाठी येतात. असे पंधरा ते वीस व्यापारी दरवर्षी हा व्यवसाय करतात. यात काटेवाड गाढवे विशेष लक्ष वेधून घेतात.

ती गाढवे तेथील व्यापारी थेट या बाजारात आणतात. ही गाढवे कामासाठी मजबूत असतात. त्यामुळे या गाढवांना विशेष मागणी असते. मात्र यांचा बाजार चढा राहतो. त्या तुलनेत स्थानिक गाढवांच्या किमती कमी राहतात. यंदा काम कमी असल्याने गाढवांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार थोडे नरमच राहिले. 

बुलेट
- दोन दिवसांत सुमारे एक कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल झाली. 
- गाढवांच्या दातावरून किंमत ठरविली जाते. 
- दुवान, चौवान, कोरा या प्रमाणे त्याचे गट केले जात होते. 
- कामानुसार मजबूत गाढवांच्या किमती ठरत होत्या.

गुजरात येथील औढामेला गावातून वीस गाढवे दिवाळीच्या दरम्यान खरेदी केली होती. रविवारी दुपारपर्यंत सर्व गाढवांची विक्री झाली. तीस हजार रुपयांपर्यंत काही गाढवे विक्री केली. मात्र यंदा बाजार गेल्या वर्षीसारखाच राहिला.
- बापू धोतरे, व्यापारी

काठेवाड गाढवांना विशेष मागणी
कामासाठी काठेवाडबरोबर महाराष्ट्रीयन गाढवांना विशेष मागणी राहते. मिरज-सांगली येथील वीटभट्टीचालक माती आणण्यासाठी या गाढवांचा वापर करतात. जेथे वाहने जाऊ शकत नाहीत तेथेच सध्या गाढवांना काम उरले आहे. रायगड किल्ल्यावरील दगड वाहतुकीसाठी साठ ते सत्तर गाढवांची खरेदी यंदाच्या बाजारात झाली. पंढरपूर, मिरज, सांगली, माळेगाव, परंडा या परिसरातील व्यापारी गाढवे खरेदीसाठी आले होते. 

Web Title: Donkey Demand Decrease by Drought