उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ द्या, मग साखर, लाडू, पेढे वाटू : शिवसैनिक

Don't Celebrate before Uddhav Thackeray Takes Oath, Anything can happen said Shiv Sena Activist.jpg
Don't Celebrate before Uddhav Thackeray Takes Oath, Anything can happen said Shiv Sena Activist.jpg

पुणे : भाजपचे सरकार अवघ्या तीन दिवसात कोसळल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आनंदात असलेल्या शिवसैनिकांनी स्वताःच्या भावनांना आवर घातली आहे. ''कधी काय घडेल याचा नेम नाही, उगीच पचका नको', म्हणून आधी शपथविधी होऊ द्या मग जल्लोष करू ,अशी सावध भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करून भाजपला पाठिंबा दिल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर पवार हे उपमुख्यमंत्री झाले. यानंतर भाजपने राज्यभर जल्लोष केला होता. मात्र, महाविकास आघाडीतील आमदार फुटत नसल्याचे समोर आल्याने व सर्वोच्च न्यायालयाने उघड बहुमतचाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. त्यामुळे अवघ्या तीन दिवसात भाजपचे सरकार कोसळले.

पोलिस कोठडीत आरोपींचा आत्महत्येचा प्रयत्न

आता शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी निर्माण झाली असून, बुधवारी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्‍यता आहे. फडणवीस सरकार पडल्यानंतर शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला असला तरी शिवसैनिक मात्र, जल्लोष करण्याच्या तयारीत नाहीत. यापूर्वी राज्यपालांनी शिवसेनेला मुख्यमंत्री स्थापनेचे निमंत्रण दिलेले असताना शिवसैनिकांनी ढोल-ताशा वाजवून, फटाके फोडून जल्लोष केला होता. पण, काँग्रेसचे पाठिंब्याचे पत्र न आल्याने शिवसैनिकांच्या अतिउत्साहाचे हसे झाले होते. त्यामुळे आधी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ द्या, मग साखर, लाडू, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करू''असे शिवसैनिक म्हणत आहेत. 
अजित पवार यांनी सोडली भाजपची साथ; अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com