esakal | Corona Virus : घाबरू नका, मात्र काळजी घ्या : प्रकाश जावडेकर 

बोलून बातमी शोधा

Don't panic but be careful said Prakash Javadekar

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री जावडेकर यांनी शनिवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याशी संवाद साधला. त्यांनी प्रशासनाच्या वतीने सुरू असलेली कार्यवाही आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. 

Corona Virus : घाबरू नका, मात्र काळजी घ्या : प्रकाश जावडेकर 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना व्हायरस प्रतिबंधाबाबत आवश्‍यक उपायोजनांसाठी केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करण्यात येईल. घाबरू नका, मात्र काळजी निश्‍चित घ्या, असे आवाहन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नागरिकांना केले.
 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री जावडेकर यांनी शनिवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याशी संवाद साधला. त्यांनी प्रशासनाच्या वतीने सुरू असलेली कार्यवाही आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. 
 
- कोरोनासोबतच्या लढतीत मदत करतंय गुगलचं 'हे' भन्नाट फिचर..

जावडेकर म्हणाले, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य व्यवस्था, औषध पुरवठा आणि जनजागृतीचे कार्य सुरू आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने कोरोना संदर्भात आवश्‍यक जनजागृती केली जाईल. कोरोना उपाययोजना करताना केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करण्यात येईल. काही व्यक्तींना कोरोनाबाबत आवश्‍क प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. जेणेकरून या व्यक्ती त्या क्षेत्रातील इतर नागरिकांना माहिती देऊ शकतात. नागरिकांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावे, यासाठी जनजागृती करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- गुड न्यूज : सलग तिसऱ्या दिवशी चीनने मारली बाजी; वाचा सविस्तर बातमी