‘डबल डेकर’च्या भूमिपूजनाला मुहूर्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महामेट्रोकडून दोन वर्षांत हा उड्डाण पूल उभारण्यात येणार असून, त्यावर मेट्रो मार्ग असेल. 

पुणे - नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर वेळ मिळाला असून, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महामेट्रोकडून दोन वर्षांत हा उड्डाण पूल उभारण्यात येणार असून, त्यावर मेट्रो मार्ग असेल. 

वनाज-रामवाडी मेट्रो मार्गावर नळस्टॉप चौकात कर्वे रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. एसएनडीटी महाविद्यालयापासून नळस्टॉप चौकाच्या पुढे भारत पेट्रोलिमयच्या पंपादरम्यान हा पूल असेल. सुमारे ५४२ मीटर त्याची लांबी असून, एकूण १४ मीटर रुंदी असेल. त्यावर सुमारे ८ ते १० मीटर उंचीवर मेट्रो मार्ग असेल. सुमारे १३ खांबांवर उड्डाण पूल आणि मेट्रो मार्ग असेल. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी हा पूल सुचविला होता. त्यांच्या कार्यकाळात पुलासाठी सुमारे १४ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कामाच्या प्रगतीनुसार महापालिका उर्वरित खर्च महामेट्रोला देणार आहे. या पुलाच्या उभारणीची तयारी महामेट्रोने सुरू केली आहे. त्यासाठी कर्वे रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेटिंग उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुढच्या टप्प्यात एसएनडीटीजवळ पुलाचे खांब उभारण्याचे काम सुरू होणार आहे. या पुलाच्या भूमिपूजनासाठी महापौर मुक्ता टिळक, मोहोळ गेल्या महिन्यापासून प्रयत्न करीत होते. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता भूमिपूजन करण्याची तयारी दर्शविली आहे. एसएनडीटी महाविद्यालयाशेजारील मैदानावर पुलाचे भूमिपूजन होईल.

पुलाच्या उभारणीसाठी ३५ कोटी
या पुलामुळे कर्वे रस्त्यावरून वाहने नळस्टॉप चौक ओलांडून जातील. त्यामुळे नळस्टॉप चौकातील कोंडी कायमस्वरूपी निकालात निघू शकेल. पुलासाठी सुमारे ३५ कोटी रुपये खर्च येणार आहे. कामाच्या प्रगतीनुसार महापालिका टप्प्याटप्प्याने हा खर्च महामेट्रोला देणार आहे.

Web Title: Double Decker bridge Bhumi Pujan on friday