Pune Rains : तीन दिवसांत दुप्पट पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पुण्यात १ ते २३ सप्टेंबरदरम्यान पडलेल्या पावसाच्या दुप्पटीपेक्षा जास्त पाऊस तीन दिवसांमध्ये कोसळला. या महिन्यातील २६ पैकी फक्त एकच दिवस शहरात गैरहजेरी लावली. यापैकी पहिल्या २३ दिवसांमध्ये ९०.९ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. तर, मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांमध्ये १९६.३ मिलिमीटर पाऊस कोसळल्याची नोंद भारतीय हवामान खात्यात झाली आहे. 

पुणे - पुण्यात १ ते २३ सप्टेंबरदरम्यान पडलेल्या पावसाच्या दुप्पटीपेक्षा जास्त पाऊस तीन दिवसांमध्ये कोसळला. या महिन्यातील २६ पैकी फक्त एकच दिवस शहरात गैरहजेरी लावली. यापैकी पहिल्या २३ दिवसांमध्ये ९०.९ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. तर, मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांमध्ये १९६.३ मिलिमीटर पाऊस कोसळल्याची नोंद भारतीय हवामान खात्यात झाली आहे. 

या महिन्यात १ ते २३ या दरम्यान १९ सप्टेंबरला सर्वाधिक म्हणजे २५.९ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मात्र, मंगळवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. त्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ५५.९ मिलिमीटर पाऊस हवामान खात्याच्या शिवाजीनगर येथील वेधशाळेत नोंदला गेला. मंगळवारी रात्री नऊ वाजता पुन्हा पावसाला सुरवात झाली. रात्रभर पाऊस पडत होता. सकाळी बुधवारी साडेआठ वाजेपर्यंत ८७.३ मिलिमीटर पाऊस कोसळला. तर, बुधवारी रात्री नऊ वाजता पावसाला पुन्हा सुरवात झाली. मध्यरात्रीनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली. या दरम्यान सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ५३.१ मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double rain in three days