पुणे - पिंपरीत व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू 

संदीप घिसे 
बुधवार, 2 मे 2018

पिंपरी (पुणे) : पिंपरी मार्केट येथील एका व्यापाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी (ता.२) सकाळी उघडकीस आली. 

प्रदीप हिंगोराणी (वय ५०, रा. बी ब्लॉक, पिंपरी मार्केट) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोराणी यांचा पिंपरीमध्ये साबणाचा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या गळ्यावर जखमाही आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

Web Title: doubtful death of businessman in pimpri