‘डीपी’तील बदललेल्या स्थळांची पाहणी सुरु

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

पुणे - राज्य सरकारकडून पुण्याच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याला (डीपी) मंजुरी दिली आहे. त्यावरील हरकती व सूचनांवर सुनावणी पूर्ण झाली आहे. मंगळवारपासून आराखड्यातील बदलांच्या स्थळपाहणीला सुरवात करण्यात आली असल्याची माहिती नगररचना विभागाचे सहसंचालक अविनाश पाटील यांनी दिली. 

राज्य सरकारने जानेवारीमध्ये शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याला मान्यता दिली. राज्य सरकारनेच नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने वगळलेली आरक्षणे पुनर्स्थापित करत ही मान्यता दिली होती. त्यामुळे विकास आराखड्यामध्ये दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बदल झाला आहे. या बदलांवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर नागरिकांकडून २ हजार ४०० हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या होत्या.आराखड्यात राज्य सरकारने केलेले बदल काही नागरिकांना, स्वयंसेवी संघटनांना अमान्य होते, तर काहींनी या बदलांचे स्वागत केले. त्यामधील ‘एचसीएमटीआर’ची रेषा (उच्चक्षमता द्रुतगती बाह्यवर्तुळाकार मार्ग), मेट्रो अलाईनमेंट या संदर्भात आक्षेप नोंदविले गेले. या सर्व बदलांच्या स्थळपाहणीस मंगळवारपासून प्रारंभ झाला. जूनअखेरपर्यंत पाहणीची प्रक्रिया करून अहवाल शासनाला सादर होईल, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: dp changes place watching