डीपी रस्ता अर्धवट अवस्थेत

वारजे - डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी) रस्त्यावर टाकण्यात आलेला राडारोडा.
वारजे - डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी) रस्त्यावर टाकण्यात आलेला राडारोडा.

वारजे - येथे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी रस्ता) हा पर्यायी रस्ता सुरू झाला. मात्र, हा रस्ता फक्त अर्धा किलोमीटरचा तयार झाला आहे. काही अज्ञात व्यक्ती येथे राडारोडा टाकत असल्याने रस्तानिर्मितीत अडथळे येत असून, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हा डीपी रस्ता गेल्या वर्षभरापासून अर्धवट अवस्थेत आहे, त्यामुळे सेवा रस्त्यावर मोठा ताण पडत आहे. सेवा रस्त्यावर अनेक मोठ्या सोसायट्या निर्माण झाल्या असून, येथील लोकसंख्येचे प्रमाण वाढले आहे. येथील नागरिकांना शहरात यायचे असल्यास वारजे हायवे चौक रस्त्याकडे यावे लागते, त्यामुळे सेवा रस्त्यावरील गर्दी वाढत आहे. परिणामी, डुक्कर खिंडीतून कर्वेनगरला जाण्यासाठी हा पर्यायी डीपी रस्ता सोयीचा आहे. यामुळे दोन किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. तसेच, बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांना महामार्गावरून डीपी रस्त्याने शहरामध्ये प्रवेश करता येऊ शकतो. असा हा मोक्‍याचा रस्ता नागरिकांसाठी लवकर होणे गरजेचे आहे. 

नुकतीच या रस्त्याची महापालिका आयुक्त सौरभ राव व नगरसेवकांनी पाहणी केली. या वेळी राव यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.

या रस्त्यासाठी या वर्षीच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात २ कोटींची मागणी केली आहे, त्यामुळे हा डीपी रस्ता होणे नागरिकांच्या दृष्टीने गरजेचे आहे.
- दीपाली धुमाळ, नगरसेविका

डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर रस्ता लवकर तयार झाला तर महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यावरील ताण कमी होऊन अपघातांचे प्रमाण निश्‍चितच कमी होण्यास मदत होईल.  
- संजय सोळंकी, नागरिक 

काही अज्ञात व्यक्ती या रस्त्यावर राडारोडा टाकत आहेत, त्यामुळे रस्तानिर्मितीत अडथळे येत आहेत. हा रस्ता नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. 
- ज्ञानेश्‍वर ठोंबरे, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com