डॉ. आयाज तांबोळी यांची एक्सेलन्स इन गव्हर्नन्स पुरस्कारासाठी निवड

dr aayaj tamboli
dr aayaj tamboli

टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्यातील छत्तीसगड येथे कार्यरत असणारे बस्तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. आयाज तांबोळी यांना देशाच्या प्रतिष्ठित वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसने एक्सेलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड साठी निवडले आहे. नवी दिल्ली येथील हॉटेल ओबेरॉय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात 28 फेब्रुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मुखई (ता. शिरूर) येथील डॉ. तांबोळी हे मुळचे रहीवासी आहेत. 2009 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांची छत्तीसगड येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या पुरस्काराच्या स्पर्धेत समाविष्ट असलेल्या 250 लोकांमध्ये भारताचे माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीद्वारे त्यांची निवड करण्यात आली. त्यांना आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या क्षेत्रातील लोकांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा पूरविण्याचे काम त्यांनी केले. जिल्हा कलेक्टर म्हणून बीजापूर सारख्या तिबॉलीच्या संवेदनशील भागात आरोग्याच्या क्षेत्रात अनेक महत्वाचे कार्य केले आहे. बीजापूर जिल्ह्यातील डॉक्टरांची कमतरतेवर मात करत जिल्हा रुग्णालयात अनेक महत्वाच्या आरोग्याच्या सेवा पुरविल्या. याबरोबरच जंगलमधील भारतातील पहिले आरोग्य आणि निरोगीपणा केंद्र देखील स्थापन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com