भाजप-सेनेच्या यात्रा मुख्यमंत्रीपदासाठी पण राष्ट्रवादीची यात्रा...- डॉ. अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पिंपरी : शिवसेना आणि भाजपच्या यात्रा (अनुक्रमे जनआशीर्वाद आणि महाजनादेश) मुख्यमंत्रीपदासाठी असून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही रयतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आहे. त्यामुळे त्या दोन यात्रांशी शिवस्वराज्यची तुलनाच होऊ शकत नाही आणि तुलनाही करू नका, असा हल्लाबोल शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी गुरुवारी पिंपरी चिंचवडमध्ये केला. 

भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर दोन तास बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते. खासदार झाल्यानंतर ते प्रथमच शहरात आले होते. यावेळी त्यांच्यातील नेत्यापेक्षा अभिनेत्याचेच अप्रूप अधिक असल्याचे दिसून आले. पालिकेतील लिफ्टमन ते अधिकारी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांच्यासोबत सेल्फीचा मोह आवरला नाही. त्यासाठी मोठी गर्दी झाली होती. एका ज्येष्ठ महिला कार्यकर्तीचीही ही मागणी त्यांनी प्रेमाने पुरवली. 

मुख्यमंत्र्याच्या यात्रेनंतर त्यांच्याकडे असलेल्या गृहमंत्रीपदावर खा. कोल्हे यांनी दुसरा निशाणा साधला. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यानेच राज्यातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यंमत्र्यांच्या नागपूर शहरातही गुंडगिरी बोकाळली असून याप्रकरणी लोकांचा आवाज सत्ताधाऱ्यांचा ऐकूही जात नाही. हे सत्तेच्या मस्तीचे प्रतीक आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. 

पक्षातील नेते गेले असले,तरी पक्षाच्या इमारतीच्या तळातील मजबूत वीट असलेले कार्यकर्ते कायम असल्याने राष्ट्रवादीचा इमला ढासळणार नाही, असा विश्वास त्यांनी पक्षाच्या आऊटगोईंगवर व्यक्त केला. राष्ट्रवादी परिवर्तनाच्या टप्यावर आहे, असे ते म्हणाले. मोदी लाटेत भोसरीतील गतवेळचे मताधिक्‍य यावेळी पन्नास हजाराने घटल्याने विधानसभेला तेथून आमचा आमदार होणार, ही शक्‍यता नाही,तर खात्री आहे,असे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Amol kolhe clarification about NCP shivswarjya Yatra