Video : अखेर डॉ. अमोल कोल्हेंनी केली 'ती' मोठी घोषणा

Dr. Amol Kolhe finally announced big announcement
Dr. Amol Kolhe finally announced big announcement

पुणे : दोन दिवसांपूर्वी अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहत मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर अमोल कोल्हे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनंतर त्यांनी अखेर ही मोठी घोषणा केली असून कोल्हेंची निर्मीती असलेल्या जगदंब क्रिएशन्सच्या बॅनरखाली एकूण तीन चित्रपट येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 

ही एक मोठी राजकीय घोषणा असेल पण नाही ही राजकीय घोषणा नसून जगदंब क्रिएशन्स पुढच्या टप्यावर असून जगदंब क्रिएशन चित्रपट निर्मीतीत उतणार असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. शिवप्रताप वाघनखं, शिवप्रताप वचपा, शिवप्रताप गरुडझेप अशा एकूण तीन चित्रपटाची निर्मीती करण्यात येणार असून हे तीनही चित्रपट केवळ मराठीत नव्हे तर हिंदीतही हे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

शिवप्रताप वाघनखंचा पहिला टीझरही यावेळी लॉंच करण्यात आला आहे. हा चित्रपट ०६ नोव्हेंबर २०२० रोजी प्रदर्शित होणार असल्याचे कोल्हेंनी सांगितले. जगदंब क्रिएशन्सचे सहनिर्माते विलास मनोहर सावंत आणि डॉ. घनश्याम नागोजीराव यांचेही कोल्हेंनी यावेळी आभार मानले. तसेच, मी एकदा संकल्पना सांगितल्यावर या दोघांनी सत्यात उतरविण्यासाठी ते जे कष्ट घेतात ते शब्दांत न मांडता येणारे आहेत असे ते म्हणाले. 

पुरस्कार वापसीला सुरवात; मुजतबा हुसैन 'पद्मश्री' परत करणार

दरम्यान, जगदंब क्रिएशन्स बॅनरखाली यापूर्वी एक नाट्य एक महानाट्य आणि दोन मालिका करण्यात आलेल्या आहेत. या मालिकेच्या प्रवासात झी मराठीचे मोठे योगदान असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. हे सांगताना त्यांनी झी मराठीचे आभारही मानले. सोनी मराठीचेही त्यांनी आभार मानले असून सोनी मराठीच्या अजय मालवणकर आणि सोहा कुलकर्णी यांचा त्यांनी उल्लेख केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com