Video : औंध संस्थानकडून कलेची पाठराखण - ढेरे

टिळक रस्ता - ‘मसाप’च्या वास्तूसाठी जमीन बक्षीस देणारे औंध संस्थानचे अधिपती राजा भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या तैलचित्राचे अनावरण मसापमध्ये करण्यात आले. या वेळी (डावीकडून) प्रकाश पायगुडे, उल्हास पवार, डॉ. अरुणा ढेरे, प्रा. मिलिंद जोशी, सुनीतार
टिळक रस्ता - ‘मसाप’च्या वास्तूसाठी जमीन बक्षीस देणारे औंध संस्थानचे अधिपती राजा भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या तैलचित्राचे अनावरण मसापमध्ये करण्यात आले. या वेळी (डावीकडून) प्रकाश पायगुडे, उल्हास पवार, डॉ. अरुणा ढेरे, प्रा. मिलिंद जोशी, सुनीतार

पुणे - ‘औंध संस्थानच्या पंतप्रतिनिधींनी आपल्या राज्यकारभारातून दाखवून दिले, की कलासंस्कृती, साहित्य आणि शासन यांच्यात सुसंवाद कसा असावा. ते साहित्यसंस्कृतीचे पाठीराखे होते,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये (मसाप) औंध संस्थानचे अधिपती राजा भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या तैलचित्राच्या अनावरण प्रसंगी त्या बोलत होत्या. 
या वेळी परिषदेचे कार्यकारी विश्‍वस्त उल्हास पवार, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, मसापचे कोकण विभाग प्रतिनिधी प्रकाश देशपांडे उपस्थित होते.

हे तैलचित्र लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर चिपळूण आणि मसाप चिपळूण शाखा यांच्या वतीने परिषदेला देण्यात आले असून, देवरूखचे चित्रकार विक्रम परांजपे यांनी ते साकारले आहे. या परिषदेची हक्काची वास्तू उभारण्यासाठी संस्थानचे अधिपती राजा भवानराव यांनी मसापला टिळक रस्त्यावर जागा दिली. त्यामुळे परिषदेच्या कार्याला स्थैर्य आले. हे तैलचित्र परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात लावण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com