आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकीच्या संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

इटलीमधील आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या (आयसीटीपी) संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर यांची नियुक्ती झाली आहे. या नोव्हेंबरपासून पुढील पाच वर्षे ते संचालकपदाची धुरा सांभाळणार आहे. आयसीटीपी' ही सैद्धांतिक (थेरॉटीकल) भौतिकशास्त्रात संशोधन करणारी जगातील प्रतिष्ठित संस्था आहे. 

पुणे ः इटलीमधील आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्राच्या (आयसीटीपी) संचालकपदी डॉ. अतीश दाभोलकर यांची नियुक्ती झाली आहे. या नोव्हेंबरपासून पुढील पाच वर्षे ते संचालकपदाची धुरा सांभाळणार आहे. आयसीटीपी' ही सैद्धांतिक (थेरॉटीकल) भौतिकशास्त्रात संशोधन करणारी जगातील प्रतिष्ठित संस्था आहे. 

दाभोलकर म्हणाले, "आयसीटीपी सारख्या विश्‍वविख्यात संस्थेचे संचालन करायची संधी मिळणे, हा एक मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे. जागतिक स्तरावर उच्च दर्जाचे संशोधन व्हावे, यासाठी विज्ञानातील बदलते वास्तव आणि दिशा यांच्यातून पुढील नियोजन करण्याचा माझा मानस आहे.'' 

दाभोलकर हे भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) पदवीधर असून त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकशास्त्रात डॉक्‍टरेट प्राप्त केली. 1996 मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थान (टीआयएफआर) येथे प्राध्यापक म्हणून काम केले.

2006 मध्ये त्यांना "शांतिस्वरूप भटनागर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या "पुंज्यभौतिकशास्त्राद्वारे कृष्णविवराच्या अपक्षय (एन्ट्रॉपी) आणि स्ट्रिंग सिद्धांतावरील संशोधना'बद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता. फ्रान्समध्ये त्यांना 2007 मध्ये "चेअर ऑफ एक्‍सलन्स' या अध्यासनाने गौरविण्यात आले. "आयसीटीपी' ही युनिस्कोची प्रथम श्रेणीची संस्था आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Atish Dabholkar is Selected as Director of International Theoretical Physics