देशात राज्यकर्ते नाझीवादाचे करताहेत समर्थन : डॉ. बाबा आढाव

‘‘जर्मनीसारख्या देशाने हिटलराला सोडून दिले. पण, आमच्याकडे ‘आम्हाला जगाचे नेतृत्व करायचे आहे’, असे आव्हान केले जात आहे.
 Dr Baba Adhav statement  rulers of country supporting Nazism German racialist shard pawar pune
Dr Baba Adhav statement rulers of country supporting Nazism German racialist shard pawar puneSakal

पुणे : ‘‘जर्मनीसारख्या देशाने हिटलराला सोडून दिले. पण, आमच्याकडे ‘आम्हाला जगाचे नेतृत्व करायचे आहे’, असे आव्हान केले जात आहे. जर्मनीने नाझीवाद सोडला, परंतु आपल्या देशामध्ये आताचे राज्यकर्ते उघडउघडपणे त्याचे समर्थन करत आहेत,’’ असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.पद्मगंधा प्रकाशन आणि लोकशाहीमध्ये समंजस संवाद आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने ॲड. जयदेव गायकवाड लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंतांचा संघर्ष’ ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रकाशक अभिषेक जाखडे, ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘‘आपण एकमेकांना दुरुस्त करण्यापेक्षा काळाने नवे आव्हान निर्माण केलंय ते पेलण्यासाठी तयार व्हायला हवे.’’, असेही डॉ. आढाव यांनी अधोरेखित केले.

पवार म्हणाले, ‘‘बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आजही देश एकसंध राहिला आहे. त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे. बाबासाहेब हे भविष्याचा वेध घेणारे होते. जेथे अन्याय होतो, तेथे संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली.’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सर्वंकष विचार करण्यासाठी खोलवर विचार करणे गरजेचे असल्याचे ॲड. गायकवाड यांनी सांगितले. यावेळी डॉ. पाटणकर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खोरे यांनी, तर सूत्रसंचालन दिपक म्हस्के यांनी केले.

‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन दलित, अस्पृश्य, शेतकरी, कामगार, स्त्रिया यांसह समाजातील उपेक्षित घटक यांना समान न्याय व सन्मानजनक वागणूक मिळावी, यासाठी समर्पित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतीक असून, त्यांचे संपूर्ण जीवन हे सामाजिक परिवर्तनाची चळवळ होती.’’

- शरद पवार, ज्येष्ठ नेते व अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पवार यांच्या उपस्थितीत कडक बंदोबस्त

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर असताना झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रम सुरू होण्याच्या अर्धातास आधीच सर्व प्रवेशद्वारे बंद करून घेतली होती. त्याशिवाय रंगमंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंदणी (नाव, मोबाईल नंबर) आणि सोबत असलेल्या साहित्याची कसून तपासणी करण्यात येत होती. एवढचं नव्हे, तर कार्यक्रमानंतर पवार साहेबांची गाडी बाहेर पडल्यानंतर रंगमंदिरातील नागरिकांना बाहेर सोडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com