कोरेगाव भीमा येथे सर्वधर्मीय एकत्र 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत उत्साहात साजरी केली. येथील ग्रामपंचायत कार्यालयातही सर्व पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. 

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत उत्साहात साजरी केली. येथील ग्रामपंचायत कार्यालयातही सर्व पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. 

कोरेगाव भीमातील वढू चौकात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, घोडगंगाचे माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे, कैलासराव सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, बाळासाहेब फडतरे, राजाराम ढेरंगे, अशोक गव्हाणे, अशोक नरहरी गव्हाणे, सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, केशवराव फडतरे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गव्हाणे, नितीन गव्हाणे आदी उपस्थित होते. 

राम गावडे म्हणाले, ''अनिल काशिद व सर्वधर्मीय नागरिकांनी पुढाकार घेत शिवजयंतीप्रमाणेच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती एकत्रितपणे व सलोख्याने साजरी करून समाजासमोर स्तुत्य आदर्श ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देश व सर्व समाजासाठी केलेले कार्य तसेच विचार अनुकरणीय आहेत.'' 

विठ्ठलराव ढेरंगे म्हणाले, ''रयतेचे राजे शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, तर डॉ. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून सर्वांना अधिकार दिले. बाबासाहेबांचे विचार व सामाजिक संदेश जगाने स्वीकारले आहेत. त्यानुसार समाजात एकोपा जपण्याचीही गरज आहे.'' 

या वेळी ग्रामपंचायत कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शिक्रापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश गलांडे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, सहायक फौजदार अनिल कोळेकर, कांबळे, पोलिस पाटील मालन गव्हाणे आदी उपस्थित होते.

Web Title: Dr Babasaheb Ambedkar jayanti celebrated at Koregaon bhima