जीवनशैलीत परिवर्तनाशिवाय तरणोपाय नाही - डॉ. बालाजी तांबे

Dr-Balaji-Tambe
Dr-Balaji-Tambe

पुणे - ‘निसर्गाशी अनैसर्गिक वागल्यानेच जगभर जनपदोध्वंस सुरू आहे. निसर्गाला शरण जात माणुसकीची स्थापना हाच एक उपाय आहे. माणसाने स्वतःच्या आचरणात, जीवनशैलीत परिवर्तन करण्याखेरीज तरणोपाय नाही,’’ असा इशारा ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी आज दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बालाजी तांबे फाउंडेशनच्या वतीने ‘संतुलन जीवनाचे, एक संकल्प – सत्यदर्शनाकडे वाटचाल (लाईफ इन बॅलन्स मूव्हमेंट – टोवर्डस् ट्रू परसेप्शन)’ या ऑनलाईन प्रकल्पाचे उद्‍घाटन करताना श्रीगुरू तांबे बोलत होते. सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, फाउंडेशनचे संचालक सुनील तांबे, डॉ. मालविका तांबे यावेळी उपस्थित होते. 
जगभरच अनैसर्गिक आचार-विहार, भ्रष्टाचार वाढला आहे, याविषयी खंत व्यक्त करीत श्रीगुरू तांबे म्हणाले, ‘‘विज्ञान त्याच्या जागी ठीक आहे. मात्र विज्ञानावर श्रद्धा ठेवताना आपण भौतिकाच्याच मागे लागलो. त्या भौतिकामागच्या अज्ञात शक्तीवरची, आपल्यातील प्राणशक्तीवरची श्रद्धा विसरलो. दगडातही चैतन्य असते हा विचार गमावला. निसर्गाने गेल्या काही वर्षात सातत्याने इशारे दिले, पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातून सध्याचा जनोपदोध्वंस सुरू आहे. त्यावर उपाय म्हणून, निसर्गाला अनुरूप जीवनशैली ठेवण्यातच आपणा सर्वांचे हित आहे. या प्रकल्पांतर्गत आठ कर्मे सहा पातळ्यांवर सांगितली आहेत. या कृती करताना आंतरिक बदल होत जातील आणि आंतरिक बदलांचा प्रभाव बाह्यवातावरणावर पडेल.’

या प्रकल्पाचा ‘ट्रेझर हंट’ असा उल्लेख पवार यानी केला. ट्रेझर हंटमध्ये सर्व कुटुंब सहभागी होऊ शकते, तसेच येथे आहे. प्रत्येक टप्प्यावर योग्य विचार, दृष्टिकोन सापडावा यासाठी श्रीगुरूजी मार्गदर्शन करतात. येथे प्रत्येक जण जिंकतोच. वैदिक विज्ञानाचा व ऐहिक समृद्धीचा समतोल राखण्याचा गुरूमंत्र श्रीगुरूजीनी दिल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले.  सध्याच्या काळात ताण, भीती, असुरक्षितता वाढत गेल्याने साऱ्या समाजातच अस्वस्थता वाढत चालली आहे, त्यावर श्रीगुरूजींनी आपल्या हाती एक उत्तम उपाय दिल्याचे सुनील तांबे यांनी प्रास्ताविकात सांगितले. 

सुमारे दीड तास झूमद्वारे चाललेल्या या समारंभात विविध देशातील दर्शक सहभागी झाले होते. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, प्रोफेसर वायबल कार्लसरुहे (युरोप), ब्रिगिटे हाइनरिच (ग्लायशेन), रेने हान्सवेन्सेल (स्वीडन), गाबी आर्मस्टॉंग (मायामी), डॉ. नेहा शर्मा, निधी गोयल, दीपिका शर्मा (न्यूझिलंड) व संजय तांबे (जर्मनी) यांनीही आपापल्या देशातून मनोगते व्यक्त केली. डॉ. मालविका तांबे यांनी आभार मानले, करण माखिजा याने सूत्रसंचालन केले.

संकेतस्थळावर कार्यक्रम उपलब्ध
सकारात्मक व नैसर्गिक जीवनशैली अनुसरण्याला मदत करणारी आठ कर्मे व सहा विभाग या कार्यक्रमात आहेत. http://lifeinbalance.in  या संकेतस्थळावर हा कार्यक्रम उपलब्ध आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com