Pune News : विद्या प्रतिष्ठानचे 52 विद्यार्थी बनणार पोलिस शिपाई; डॉ भरत शिंदे

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातून 122 विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत यशस्वी
dr bharat shinde Pune 52 students of Vidya Pratishthan will  police constables baramati
dr bharat shinde Pune 52 students of Vidya Pratishthan will police constables baramatiesakal

बारामती : येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा समिती अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केंद्रातून पोलीस शिपाई पदासाठी 52 विद्यार्थ्यांनी राज्यसेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी माहिती दिली.

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातून 122 विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झाले आहेत. मागील वर्षी मार्चमधे एकूण 18 विद्यार्थी पोलिस उपनिरिक्षक पदासाठी पात्र ठरले होते. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातून ग्रामीण भागातील विद्यार्थी तहसीलदार, लेखाधिकारी, विक्रीकर निरिक्षक, लेखापरिक्षक, पोलीस शिपाई, पोलिस उपनिरिक्षक पदावर विराजमान झालेले आहेत.

स्पर्धा परीक्षा समितीचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले व समितीतील सदस्यांनी परिश्रम घेतल्याबद्दल प्राचार्य डॉ शिंदे यांनी अभिनंदन केले. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांच्या सुचनेनुसार प्राचार्य डॉ. शिंदे यांनी सुरू केलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून असंख्य होतकरू विद्यार्थ्यांनी राज्यसेवा परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविले आहे.

संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद, निलीमा पेंढारकर, विशाल भोसले व विशाल चव्हाण आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com