परुळेकर जयंतीनिमित्त वाटवानी यांचे व्याख्यान 

परुळेकर जयंतीनिमित्त वाटवानी यांचे व्याख्यान 

पुणे - "सकाळ'चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत वाटवानी यांचे व्याख्यान होणार आहे. "सामाजिक बदलांमागील प्रेरणेचा प्रवाह' असा डॉ. वाटवानी यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. शिवाजीनगरमधील मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात उद्या (ता. 20) सायंकाळी साडेपाच वाजता हे व्याख्यान होणार आहे. 

डॉ. वाटवानी हे गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. निराधार, अनाथ मनोरुग्णांच्या समस्येवर त्यांनी अतुलनीय काम केले. "श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर'मार्फत 1988 पासून त्यांनी शेकडो मनोरुग्णांचे पुनर्वसन केले. आशियातील प्रतिष्ठेच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे ते यंदाचे मानकरी आहेत. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मानांनी डॉ. वाटवानी यांना आजवर गौरविण्यात आले. डॉ. परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. 

उल्लेखनीय काम करणाऱ्या काही व्यक्तींचा गौरव या समारंभात डॉ. वाटवानी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जलसंधारणाच्या कामात योगदान देणारे विनायक वाळेकर, आठ अनाथ मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि तिच्या तीन मुलांचा जीव वाचविणारे निवृत्त मेजर सुरेश भोसले, ससून रुग्णालयात अनेक सुधारणा करणारे डॉ. अजय चंदनवाले, भिक्षेकऱ्यांवर उपचार करणारे डॉ. अभिजित सोनवणे यांचा त्यात समावेश आहे. 

"सकाळ'चे बातमीदार ज्ञानेश सावंत, दत्ता देशमुख यांना डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात येईल, तर पत्रकारिता आणि समाजाला जोडणारे विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पुणे विभागातून उपसंपादक शंकर टेमघरे यांना विशेष पुरस्कार या वेळी देण्यात येईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. श्रोत्यांनी कार्यक्रमाच्या वेळेआधी सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

वक्ते - डॉ. भारत वाटवानी 
स्थळ - मॉडर्न महाविद्यालय सभागृह 
तारीख - 20 सप्टेंबर 2018 
वेळ - सायंकाळी 5. 30 वाजता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com