डॉ. सायरस पूनावाला यांना "मॅसेच्युसेट्‌स'ची मानद पदवी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे - लसींच्या क्षेत्रांमधल्या भरीव योगदानाबद्दल रविवारी मॅसेच्युसेट्‌स विद्यापीठाने डॉ. सायरस पूनावाला यांना "डॉक्‍टर ऑफ सायन्स ऑन' या मानद पदवीने सन्मानित केले. तसेच, "बिल अँड मेलिंडा गेट्‌स' फाउंडेशनने "सेव्हन व्हॅक्‍सीन हीरोज ऑफ द वर्ल्ड' हा बहुमान देऊन डॉ. पूनावाला यांचा गौरव केला आहे. लसनिर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे डॉ. पूनावाला हे संस्थापक आहेत. 

डॉ. पूनावाला यांच्यासमवेत फिजिशियन आणि शास्त्रज्ञ हुडा एस., झोगबी आणि ड्युक युनिव्हर्सिटीचे नर्सिंग लीडर मेरिऑन ई. ब्रुमी यांना त्यांच्या कामगिरीबद्दल "डॉक्‍टर ऑफ सायन्स ऑन' या मानद पदवीने सन्मानित केले. याशिवाय पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन (पीएएचओ) आणि पॅन अमेरिकन हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशनतर्फे (पीएएचईएफ)  दिला जाणारा "एक्‍सलन्स इन इंटर-अमेरिकन पब्लिक हेल्थ' हा पुरस्कार मिळवणारे डॉ. पूनावाला हे पहिले भारतीय आहेत. 

आमच्या कामाचा गौरव केल्याबद्दल मी आनंदी आहे. लसनिर्मिती क्षेत्राला अपेक्षित मान दिला गेला पाहिजे. मेडिकल सायन्सशी जोडलेले एक क्षेत्र एवढ्यापुरतीच या क्षेत्राची ओळख मर्यादित नाही. उलट हे अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. आयुष्य अधिक चांगले बनवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत आणि लसीकरण त्यापैकीच एक आहे. 
- डॉ. सायरस पूनावाला, संस्थापक, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

Web Title: Dr. Cyrus Poonawalla received the honorary title of Massachusetts