डॉ. होमी भाभा रुग्णालयाचे रखडले काम; उपचारासाठी रुग्णांची धावपळ

Dr. Homi Bhabha Hospital construction work is pending since more than 1 year.jpg
Dr. Homi Bhabha Hospital construction work is pending since more than 1 year.jpg

गोखलेनगर(पुणे) : मॉडेल कॉलनी येथील डॉ. होमी भाभा रुग्णालय पाडून एक वर्ष उलटून गेले मात्र, अद्याप बांधकामाचा पाया देखील रचला गेला नाही. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे १० डिसेंबर २०१९ ला काम सुरू होणार होते, मात्र एक वर्ष दोन महिने झाले तरी, देखील कामाला वेग मिळालेला दिसत नाही.

वडारवाडी, पांडवनगर, गोखलेनगर, जनवाडी, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी परिसरातील रुग्णांसाठी डॉ. होमी भाभा रुग्णालय हा खूप मोठा आधार होता. या परिसरात गरीब, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. खाजगी रुग्णालयात जाणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे लहान, सहान आजारांवर उपचार घेण्यासाठी सामान्य नागरिकांना डॉ. होमी भाभा जवळचे व परवडणाारे रुग्णालय होते. रुग्णालय पाडल्यानंतर रुग्णांना उपचारासाठी तात्पुरत्या स्वरूपात डोंगरे कार्यालयात सुविधा करण्यात आली, मात्र डोंगरे कार्यालयात पुरेसे उपचार होत नाहीत. प्रसूतीसाठी धावपळ करावी लागते असे नागरिक सांगतात.

पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण

स्थानिक लोकप्रतिनिधींनी दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटले होते की, ''१० डिसेंबरपासून काम सुरू होत आहे'' मात्र अद्याप रुग्णालयाचा पाया देखील रचना गेलेला नाही. लोकप्रतिनिधी मात्र हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. परिसरातील महिलांना प्रसुतीसाठी शिवाजीनगर येथील डॉ. दळवी किंवा कमला नेहरू रुग्णालयात जावं लागतं. तिथं जागा नाही मिळाली तर, ससून रुग्णालय शिवायपर्याय राहत नाही. महिलांच्या नाजूक परिस्थितीत जवळपास शासकीय रुग्णालय उपलब्ध होत नाही. त्यामुळे दूर जावं लागत आहे. लवकरात लवकर रुग्णालयाची उभारणी करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

"डॉ होमी भाभा रुग्णालय नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. तात्पुरत्या स्वरुपात चालू केलेलं रुग्णालय नागरिकांना माहित नाही. प्रसूतीच्या वेळी महिलांना दळवी रुग्णालय जावं लागत आहे"
 - उपेश सोनवणे स्थानिक नागरिक, जनवाडी गोखलेनगर

पुणे विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय’तेला धक्का

"नकाशा मिळाला की, दोन दिवसात काम सुरू होईल, साधारण बांधकाम मुदत एक वर्ष असेल"
- शेखर मदाने, ठेकेदार

"डॉ होमी भाभा रुग्णालयाचे काम रखडल्याने महिला वर्गाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. कधी दळवी तर, कधी कमला नेहरू रुग्णालयाकडे धावपळ करावी लागते. यासाठी लवकरात लवकरात रुग्णालय उभे करावे"- रूबिना शेख, रहिवासी वडारवाडी

भिंत कोसळली म्हणून केलं तब्बल 400 दलितांनी धर्मांतर

"फाईलला आयुक्तांकडून मान्यता मिळाली आहे. दोन तीन दिवसात प्लॅन पास होईल"
-किरण आहेरराव, कनिष्ठ अभियंता, पुणे मनपा

पुणे विमानतळावर अपघात होता होता वाचला; वाचा काय घडले!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com