पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य  - डॉ. के. व्यंकटेशम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे -  पुणेकरांच्या सुरक्षिततेला माझे सर्वाधिक प्राधान्य राहील. लोकांची सुरक्षितता व सेवेवर भर देण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी ग्वाही पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली. 

नागपूर पोलिस आयुक्तपद सांभाळल्यानंतर राज्य सरकारच्या गृह विभागाने डॉ. के. व्यंकटेशम यांची पुणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. येत्या शुक्रवारी (ता. 3) डॉ. व्यंकटेशम हे विद्यमान पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, शुक्‍ला यांच्याकडे अतिरिक्त महासंचालक (महामार्ग) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

डॉ. व्यंकटेशम यांच्याशी "सकाळ'ने संवाद साधला. पुण्यातील प्रश्‍नांचा अभ्यास करू. नेमक्‍या कोणत्या समस्या पुणेकरांना जाणवत आहेत, याची सविस्तर माहिती घेऊ. त्यानंतर माझ्या कार्याची दिशा ठरवेन. मात्र, त्यामध्ये पुणेकरांच्या सुरक्षिततेलाच माझे प्राधान्य असेल. पुणेकरांशी संवाद साधून त्यांच्या नेमक्‍या समस्या काय आहेत ते जाणून घेईन, असे ते म्हणाले.

Web Title: Dr K Venkatesham New commissioner of police of Pune