एनसीसीएसच्या संचालकपदी डॉ. मोहन वाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Mohan Vani as Director of NCCS National Centre For Cell Science pune

एनसीसीएसच्या संचालकपदी डॉ. मोहन वाणी

पुणे : राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेच्या (एनसीसीएस) संचालकपदी डॉ. मोहन वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते संचालक डॉ. मनोज कुमार भट यांच्याकडून नुकतेच त्यांनी संचालक पदाचा कार्यभार स्विकारला. डॉ. वाणी यांनी नागपूरच्या पशूवैद्यकीय महाविद्यालयातून शल्यचिकित्सा या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी, इंग्लंडमधील लंडनच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटल मेडिकल स्कूल येथून ‘ह्युमन मेडिसीन’ या विषयात पीएचडी मिळवली आहे. एनसीसीएस मध्ये डॉ. वाणींनी ऑस्टियोपोरोसिस, ऑस्टियोआर्थरायटिस आणि संधिवात यांसारख्या महत्त्वाच्या रोगांवर सेल्युलर आणि मॉलेक्युलर पॅथोफिजियोलॉजीचे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधन चमूने स्टेम सेल बायोलॉजी आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन या क्षेत्रातही महत्त्वाचे काम केले आहे.

त्यांचे संशोधन अनेक हाय इम्पॅक्ट पीअर-रिव्युड आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे. त्यांना कॉमनवेल्थ फेलोशिप, बी.एम. बिर्ला सायन्स प्राइज, नॅशनल बायोसायन्स अवॉर्ड, टाटा इनोव्हेशन फेलोशिप यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांची नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस, इंडीयन नॅशनल सायन्स अकादमी, नॅशनल अकादमी ऑफ वेटरिनरी सायन्सेस आणि नॅशनल अकादमी ऑफ मेडीकल सायन्सेस आदी प्रतिष्ठित राष्ट्रीय विज्ञान अकादमींचे फेलो म्हणून निवड झाली आहे.

राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून मूलभूत विज्ञान परिवर्तनकारक संशोधन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आंतरविद्याशाखीय दृष्टीकोण अधिक बळकट करत आरोग्य आणि रोगांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे काम एनसीसीएस मध्ये केले जाईल.

- डॉ. मोहन वाणी, संचालक, राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस)

Web Title: Dr Mohan Vani As Director Of Nccs National Centre For Cell Science Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..