रेगेकडील पिस्तुलाचा हत्येशी संबंध नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलाचा हत्येशी संबंध नाही, असा दावा बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. सय्यद यांच्या न्यायालयात शुक्रवारी केला. तसेच, या न्यायालयास ९० दिवसांची मुदतवाढ देण्याचा अधिकार नसल्याचा दावाही चंडेल यांनी केला.  

दाभोलकर हत्या प्रकरणातील अंदुरेचा मेहुणा रेगेकडून सीबीआयने ऑगस्टमध्ये पिस्तूल जप्त केले. ते सीबीआयने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले होते; परंतु तपासणी अहवालात त्या पिस्तुलाचा संबंध दाभोलकर हत्येशी नसल्याचा अहवाल मिळाला आहे. तसेच, दोषारोपपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा अधिकार प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी न्यायालयाला नाही. अजून कोणत्या मुद्द्यांवर तपास करावयाचा आहे, आरोपीला जेलमध्ये का ठेवायचे आहे, या सर्व गोष्टी सीबीआयने स्पष्ट करणे गरजेचे होते. तसेच, तपासात सीबीआयने नेमकी काय प्रगती केली हे सांगितले नाही. त्यांनी वीरेंद्र तावडेंवर जे आरोपपत्र दाखल केले, त्याच आरोपपत्रातील मुद्दे पुन्हा मांडून ९० दिवसांची वाढ मागितली आहे. त्यामुळे त्यांना ही मुदतवाढ देऊ नये, असे ॲड. चंडेल म्हणाले. याप्रकरणी सीबीआयचे वकील बी. राजू म्हणाले, ‘‘या गुन्ह्यात रेगे याच्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलाचा दाभोलकर हत्या प्रकरणात वापर असल्याचा दावा आम्ही कधी केलेला नाही. ’’ 

Web Title: Dr. Narendra Dabholkar murder case No blood relationship from reggae pistul