'त्या’ आमदारांना एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागेल - डॉ. नीलम गोऱ्हे

कायदेशीर तरतुदीनुसार स्वतंत्र गट करणे अशक्य : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत
Dr Neelam Gorhe on maharashtra politics eknath shinde Those MLA have to merge into one party pune
Dr Neelam Gorhe on maharashtra politics eknath shinde Those MLA have to merge into one party pune sakal

पुणे : एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना शिवसेनेतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करता येणार नाही. पक्षांतर कायद्यानुसार भारतीय संविधानाच्या अनुसूची दहामधील तरतुदीनुसार त्या दोन तृतीयांश विधानसभा सभासदांना दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागेल, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत डॉ. गोऱ्हे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, शिवसेनेत बंडखोरी करणारे काही सदस्य मूळ शिवसेनेचा दावा करीत आहेत, परंतु तसे होऊ शकत नाही. २००३ पूर्वी स्वतंत्र गट तयार करता येत होता. परंतु आता ते शक्य नाही, अशी संविधानात तरतूद आहे. या संदर्भात विधिमंडळ कामकाज आणि कायदेशीर तज्ज्ञांनी मते मांडली.

शिवसेनेच्या विरोधात मतदान केल्यास अपात्र

शिवसेना हा मूळ राजकीय पक्ष आहे. जे आसाममध्ये गेलेले आहेत त्यांना राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगानुसार अद्याप कायदेशीर आधार नाही. विधानसभेत बहुमताच्या प्रस्तावावर मतदान करण्यासाठी सभागृहात यावे लागेल. तसेच, त्यांना शिवसेनेच्या बाजूनेच मतदान करावे लागेल अन्यथा ते सदस्य अपात्र ठरतील. जे सदस्य बाहेर पडले त्यांना ते सिद्ध करण्यासाठी बराच कालावधी लागेल.

- प्रा. उल्हास बापट, राज्य घटना तज्ज्ञ

सध्या थांबा आणि वाट पहा

शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांना आजमावून पाहत आहेत. कोणाला गट म्हणावे असे काही घडलेले नाही. एकनाथ शिंदे यांनीही गटाला मान्यता द्यावी असे अधिकृत पत्र दिलेले नाही. तशी मागणी झाल्यासच गटाबाबतची वैधानिकता तपासली जाईल. त्यामुळे सध्या थांबा आणि वाट पहा अशी स्थिती आहे. पुढील दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल.

- अॅड. उदय वारुंजीकर,ज्येष्ठ विधिज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com