राजकारणी महिलांना सत्ताचक्रात अडकवतात - डॉ. नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

समाजकंटकांवर कारवाई करणार
भाजपच्या मेळाव्यात काढलेल्या महिलांच्या छेडीबाबत गोऱ्हे म्हणाल्या की, राजकीय कार्यक्रमात पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते असतात. पण, काही जणांनी वेगळ्या हेतूने तेथे येऊन महिलांची छेड काढली. महिलांनी त्याला वाचा फोडली. या समाजकंटकांची नावे समजली, तर त्यांच्यावर कारवाई करू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुणे - 'राजकारणात येणाऱ्या महिलांना महापौर करतो, आमदार करतो, असे म्हणत तिला राजकारणी सत्ताचक्रात अडकवून फसवतात. राजकारणात महिलांचे काम मोजणारी मोजपट्टी दूषित आहे, ती बदलणेही गरजेचे आहे,'' असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या गौरवार्थ आयोजित व्याख्यानात "स्त्री आणि राजकारण' या विषयावर डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या वेळी साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, 'पूर्वी आरक्षणातून निवडून आलेल्या महिलांचे कारभार त्यांचे पतीच पाहत होते. पण, आता नवीन पिढी बदलली आहे. आम्हाला महत्त्वाचे पद, समित्या का दिल्या जात नाहीत, असा प्रश्‍न महिला विचारत आहेत. काही महिलांना काम केल्याशिवाय चैन पडत नाही. पण, कौटुंबिक जबाबदारीमुळे हजारमधील चार-पाच महिलाच राजकारणात सक्रिय असतात.'' सूत्रसंचालन दीपक करंदीकर यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Neelam Gorhe Talking Politics