पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमळकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी आज (बुधवार) जाहीर केले.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी आज (बुधवार) जाहीर केले.

करमळकर हे पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. विद्यमान कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे यांचा कार्यकाळ 15 मे रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे कुलगुरू पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. प्रभारी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे हे नवे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांना उद्या (ता. 18) कार्यभार देणार आहेत. 

कुलगुरुपदासाठी एकूण 90 अर्ज आले होते. छाननीनंतर केवळ 36 उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये डॉ. करमळकर यांच्यासह प्रा. एम. राजीवलोचन, प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. अंजली क्षीरसागर यांच्यासह अन्य काही जणांना समावेश होता.

Web Title: Dr. Nitin Karmalkar is new Vice Chancellor of Pune University