
‘प्रार्थना समाजाने केलेल्या अखंडित कार्यामुळे आजही समाजातील प्रगल्भता टिकून आहे. सभोवताली सुरू असलेले पर्यावरण, जैवविविधता, मूल्यांचा ऱ्हास यामुळे समाजामध्ये संघर्षाची परिस्थिती उद्भवत आहे. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रार्थना समाजासारख्या सामाजिक चळवळी कार्यरत असणे गरजेचे आहे,’’ असे मत प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांनी बुधवारी व्यक्त केले.
पुणे - ‘प्रार्थना समाजाने केलेल्या अखंडित कार्यामुळे आजही समाजातील प्रगल्भता टिकून आहे. सभोवताली सुरू असलेले पर्यावरण, जैवविविधता, मूल्यांचा ऱ्हास यामुळे समाजामध्ये संघर्षाची परिस्थिती उद्भवत आहे. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रार्थना समाजासारख्या सामाजिक चळवळी कार्यरत असणे गरजेचे आहे,’’ असे मत प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांनी बुधवारी व्यक्त केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
‘पुणे प्रार्थना समाज वार्षिकोत्सव २०१९’च्या पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अशोक कामत व डॉ. दिलीप जोग उपस्थित होते.
कामत म्हणाले, ‘‘आज समाजासाठी काम करणारे अनेक लोक आहेत; परंतु त्यांच्याकडे लक्ष देणारी माणसे नाहीत. अशा परिस्थितीत प्रार्थना समाज सुयोग्य व्यक्तींची निवड करून त्यांचा सन्मान करीत आहे, हे कौतुकास्पद आहे.’’
अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी!
याप्रसंगी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, डॉ. विश्वास सापटणेकर यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भारतीय जैन संघटना, पुणे यांना डेव्हिडा रॉबर्टस पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी अपेक्षा जाधव, शुभम फरांदे, ज्ञानेश्वर दरेकर, वैष्णवी राऊत, यशस्वी साबळे, गौरव देवरे, पूजा शिर्के, दिनेश सुंदरानी, सुकन्या
फरांदे, धनराज निंबाळकर यांना विविध शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या.
या वेळी नृत्योपासनेचा कार्यक्रम, बोधचिन्ह व संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. सूत्रसंचालन सुषमा जोग यांनी केले. या वेळी अरुण नाहर, विलास राठोड, धनश्री घाटे, प्रशांत पाडवे उपस्थित होते.