डॉ. प्रकाश आमटे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

ब्लड कॅन्सरचे निदान
Prakash-Amte
Prakash-AmteSakal

पुणे - ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सरचे निदान झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना आरामाची गरज आहे त्यामुळे त्यांना कोणीही भेटायला येऊ नका, असे आवाहन प्रकाश आमटे यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी केला आहे.

डॉ. प्रकाश आमटे हे पद्मश्री विजेते बाबा आमटे यांचे सुपुत्र असून गेल्या ४९ वर्षांपासून ते गडचिरोली मधील हेमलकसा येथे महारोगी सेवा समितीच्या "लोकबिरादरी प्रकल्प" या नावाने आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवत आहेत. "डॉ प्रकाश आमटे यांना 27 जून रोजी परत रुग्णालयात दाखल केले आहे, तरी बाहेरील व्यक्तींना प्रवेश निषेध आहे.

कृपया फोन करून तब्येत विचारू नका. वेळोवळी डॉक्टरांकडून अपडेट कळवले जातील. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो. पण या टेन्शनमध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा, "अशी पोस्ट अनिकेत आमटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com